Breaking News

महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्वदुल सत्तार मा.राज्यमंत्री अर्जुनभाऊ खोतकर यांनी पिक नुकसानीची केली पाहणी

दि.11/09/2021 बठाण बु ता.जालना येथे मा.ना.अब्दुल सत्तार साहेब महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री,मा.ना.अर्जुनभाऊ खोतकर माजी राज्यमंत्री यांनी अवकाळी पावसाने झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली व नुकसान ग्रस्त शेतकरी मोतीराम विर,कमळाजी विर,बाबासाहेब विर,कारभारी विर,भिकाजी विर, यांची भेट घेतली यात त्याना झालेल्या नुकसाणीसाठी सरसकट प्रति हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली व अति पावसामुळे पडलेल्या घरांची ही पाहणी करण्यात आली या मध्ये कमळाजी विर,दत्तात्रये उजाड,राजेंद्र बागल यांच्या घराची पडझड झाली आहे,मा. अब्दुल सत्तार साहेब यांनी ग्रामविकास अधिकारी श्री.जे.बी.बोरकर याना पंचनामे करण्याचे आदेश दिले शेतकऱ्याने क्रॉप इन्सुरेन्स मोबाईल ऍप मध्ये ऑनलाईन नोंदणी केली आहे परंतु अद्याप पर्यंत कोणत्याही पिक विमा कंपनीने पाहणी केली नाही याची माहिती दिली व जालना ग्रामीण महसूल मंडळ मध्ये मागील
दोन वर्षेपासून प्रधानमंत्री पीक विमा/ प्रधानमंत्री हवामान आधारीत फळबाग विमा या दोन्ही विमा
कंपन्या सतत महसूल मंडळ वगळत आहे.वास्तविक पाहता या मंडळा मध्ये शेतकऱ्यांचे जवळपास
९०%नुकसान झाले आहे.तरी महसूल मंडळ वगळेजाते या सर्व प्रकरनास कोण जबाबदार आहे
याची चौकशी व्हावी याचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी मा.भास्कर आंबेकर,मा.संतोष सांबरे, तलाठी काशीकर साहेब, कृषिसह्याक कुकलवाड साहेब, रामेश्वर देव्हडे,भाऊसाहेब देव्हडे,राजेंद्र देव्हडे,राजेंद्र बागल,परमेश्वर देव्हडे,सोपान देव्हडे,सुदाम देव्हडे, संजय विर,इतर गावकरी व पदाअधिकारी उपस्तीत होते

Total Page Visits: 11 - Today Page Visits: 2

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!