Breaking NewsMaharashtra

स्वातंत्र्यदिनानिमित्त इंदिरा नागरी पतसंस्थेने पायंडा मोडीत विद्यार्थिनीचे हस्ते ध्वजारोहण करून घालून दिला नवा आदर्श व दोन मुलीच्या संपूर्ण शिक्षणाचा उचलला भार 

मोहन चौकेकर चिखली 

चिखली तालुक्यात सर्वसामान्य नागरिमोकांची पतसंस्था म्हणून ओळखल्या जात असलेल्या इंदिरा नागरी पतसंस्थेने स्वातंत्र्यदिनानिमित्त आतापर्यंत चालत आलेली परंपरा मोडीत या वर्षीचे स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण एका सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीच्या हस्ते करून छात्र शक्तीला ध्वजारोहण करण्याचा मान दिला अशाप्रकारे इंदिरा पतसंस्थेने पायंडा मोडीत विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. सर्वसामान्य लोकांसाठी दिनांक १३-११ -१९८३ रोजी स्थापन झालेल्या इंदिरा नागरिक पतसंस्थेत दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येत होते मात्र यावर्षी गेल्या ३७ वर्षाची परंपरा मोडीत यावर्षी भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कुमारी हर्षली सुभाष गुंजाळकर या विद्यार्थीनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अशाप्रकारे इंदिरा नागरि पतसंस्थेने विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे . त्याचप्रमाणे या वेळी मेघावती विजय चौधरी व समद्धी विजय चौधरी या दोन विद्यार्थिनींचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च संस्था करणार आहे ध्वजारोहणानंतर पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा दहावी बारावी मध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थीनींसाचा तसेच त्यांच्या आई-वडिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी सियाचीन मध्ये शहीद झालेले चिखलीतील शहीद जवान कैलास पवार व बिबी येथील शहीद जवान किशोर काळसे व शेगाव गजानन महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील व पतसंस्थेचे सल्लागार रमेश भाऊ इंगळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्रजी हरलालका व संस्थेचे संचालक राजेंद्रजी व्यास यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी संचालक अरुणजी भोलाने , सुरेश जगदाळे , दिपक बोधेकर , राजेश फुलझाडे आदी जण उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संस्थेचे व्यवस्थापक सुनील वेंडोले यांनी केले

Total Page Visits: 43 - Today Page Visits: 2

Akshada

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!