Breaking News

WhatsApp वर लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत 

जालना प्रतिनिधी गौरव बुट्टे

सध्याच्या कोरोनास्थितीत तुम्हाला कुठेही जायचं असेल तर आता तुमचं कोरोना लसीकरण पूर्ण झालेलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे अर्थात तुमचं कोरोना लसीकरण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

दरम्यान, आतापर्यंत, हे लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी दोन पर्याय होते. पहिलं म्हणजे कोविन पोर्टल आणि दुसरं म्हणजे आरोग्य सेतू अ‍ॅप. मात्र, आता भारत सरकारने यासंदर्भात WhatsApp बरोबर भागीदारी केली आहे.

सोपी पद्धत

यासाठी तुम्हाला सर्वात आधी मायजीओवी (MyGov) कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट डाऊनलोड करावे लागेल.

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये MyGov कोरोना हेल्पडेस्कचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करावा लागेल. हा क्रमांक 9013151515 आहे.

एकदा नंबर सेव्ह झाला की व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून कॉन्टॅक्ट लिस्टमधून जाऊन सर्च करा.

कोरोना हेल्पडेस्कचा चॅटबॉक्स ओपन करून त्यात डाऊनलोड सर्टिफिकेट असं टाईप करा.

त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी पाठवेल.
ओटीपी तपासा आणि एंटर दाबा.

यानंतर चॅटबॉट तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचं कोरोना लसीकरण प्रमाणपत्र पाठवेल. ते तुम्ही डाऊनलोड करू शकता.

त्याचसोबत, या प्रक्रियेदरम्यान जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर कोणताही एरर दिसला तर तुम्ही पूर्वीप्रमाणेच कोवीन पोर्टल आणि आरोग्य सेतू अ‍ॅपशी संपर्क साधू शकता. 

Total Page Visits: 59 - Today Page Visits: 1

Akshada

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!