Breaking News

दिवसभराच्या महत्वाच्या बातम्या

 

1.लेकी हरल्या पण मनं जिंकली… भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्यपदक हुकलं, ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव , भारताच्या लेकींचं पराभवानंतरही कौतुक, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून महिला हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव

2. भारतीय महिला हॉकी संघातील हरियाणाच्या 9 खेळाडूंना मिळणार प्रत्येकी 50 लाख, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची घोषणा

3. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनिया उपांत्य फेरीत पराभूत, उद्या कांस्य पदकासाठी लढत

4. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्वीटरवरुन घोषणा

5. अकरावी सीईटीला विरोध करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पूर्ण, 10 ऑगस्टला निर्णय देणार

6. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची मुंबईत भेट.. परप्रांतीयांबाबत राज ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न.. मात्र राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा

7. सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी भाजप आक्रमक; मुंबई, ठाण्यात ठिकठिकाणी रेलभरो आंदोलनं

8. देशातील कोरोना संसर्गाचा आकडा ऑगस्टमध्ये वाढला, आज 45 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद , राज्यात गुरुवारी 6695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 7120 रुग्ण कोरोनामुक्त

9. रिझर्व बँकेचं पतधोरण जाहीर.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्याजदरात कोणतेही बदल नाहीत, सर्वसामान्यांच्या कर्जाचा ईएमआय कमी होणार नाही

10. लियोनेल मेस्सीचा बार्सिलोनासह 21 वर्षांचा प्रवास संपला, क्लबकडून घोषणा

11.कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद मिटवण्यासाठी मराठी बांधव पंतप्रधान मोदींना पाठवणार 11 हजार पत्रं पाठवणार

12.सासू-सुनेच्या नात्यातील प्रेम! सोलापुरात सासूच्या पार्थिवाला सुनांकडून खांदा

13.व्वा…! वाशिमच्या 75 वर्षाच्या आजोबांनी बनवली ई सायकल, सर्वत्र होतंय कौतुक

14. Bernard Arnault : ना बेझोस ना इलॉन मस्क, आता बर्नार्ड अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Total Page Visits: 64 - Today Page Visits: 2

Akshada

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!