Breaking NewsMaharashtra

सर्वशाखीय सोनार युवा सेना,महाराष्ट्र राज्य चा पहिला पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

अहमदनगर (प्रतिनिधी)

: सर्वशाखीय सोनार युवा सेना,महाराष्ट्र राज्य चा पहिला पदाधिकारी मेळावा दी.03 ऑगस्ट 2021 रोजी अहमदनगर-पुणे हायवे वरील हॉटेल स्वीट होम मध्ये उत्साहात व आनंदी वातावरनात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नांदेड येथील सुधाकरराव टाक (धानोरकर) हे होते तर प्रमूख पाहुणे म्हणून पिं.चिंचवड येथील मा.महापौर कैलासशेठ भांबुर्डेकर, बीड येथील सराफ फेडरेशन चे मराठवाडा अध्यक्ष श्री.गणेशशेठ बेद्रे, औरंगाबाद येथील उद्योजक मधुकरराव टाक, उद्योजक सुहासराव बार्शीकर, लाड सोनार ग्रामीन संघटनेचे मधुकरराव मैड, पोलखोलचे संपादक भगवानराव शहाणे, उद्योजक श्री.बाळासाहेब शहाणे (जखणगाव), संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते भगवानराव उदावंत, पुणे येथील उद्योजक गिरीषशेठ नगरकर, लाड सोनार ट्रस्ट अहमदनगर चे संजयसेठ देवळालीकर, शरदभाऊ कुल्थे, सचिनशेठ देवळालीकर, मुकुंदसेठ निफाडकर, ग्रामपंचायत सदस्या सौ.श्रावणीताई बेद्रे, सौ.कल्पनाताई बनसोड व ईतर युवा समाजबांधव उपस्थित होते.
सर्वशाखीय सोनार सोनार युवा सेना, महाराष्ट्र राज्य तर्फे पंधरादिवसाखाली घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे विजेते यांना कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी प्रथम क्रमांक विजेत्या सौ.कांचन अनिल टाकळीकर, तृतीय क्रमांक केशव माळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्वशाखीय सोनार सोनार युवा सेना, महाराष्ट्र राज्य च्या सर्व पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र वाटप करुन त्यांना मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सर्व मान्यवरांकडून युवकांना उत्तम असे मार्गदर्शन मिळाले.
सर्वशाखीय सोनार सोनार युवा सेना, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष योगेश शहाणे व पदाधिकारी यांनी प्रमूख मार्गदर्शक संतोषशेठ वर्मा यांचा संघटनेच्या पहील्या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे नियोजन केल्या बद्दल सत्कार करत आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमुख मार्गदर्शक संतोषशेठ वर्मा यांसह सर्वशाखीय सोनार सोनार युवा सेना, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष योगेश शहाणे, महिला सल्लागार रेखाताई नवसे, राज्य प्रसिद्धी प्रमूख रवी माळवे, प्रशांत टाक, विदर्भ संपर्क प्रमुख अनिल उंबरकर, मुंबई विभागीय प्रमुख जगदीश काजळे, मराठवाडा प्रमुख विनोद चिंतामणी, आष्टी तालुका प्रमुख दिपक डहाळे, बारामती प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर बागडे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत बेद्रे,कोल्हार यांनी केले तर संस्थापक अध्यक्ष योगेश शहाणे यांच्या वतीने राज्य प्रसिद्धी प्रमुख रवी माळवे यांनी उपस्थित मान्यवर व समाजबांधवांचे आभार प्रदर्शन केले.

Total Page Visits: 78 - Today Page Visits: 1

Akshada

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!