Breaking NewsMaharashtra

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चिखलीत कलावंत, कामगारांचा मेळावा , शालेय साहित्य ,वृक्ष वाटप तसेच महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रम संपन्न

चिखली

शोषित ,वंचित ,कष्टकरी कामगारांचा आक्रोश शब्दातुन मांडणारे थोर सुमाजसुधारक ,विचारवंत, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीचे औचित्य साधून चिखली येथे दि.1 ऑगस्ट 2021 रोजी चिखली येथील पंचायत समिती सभागृहात शोषित, वंचित ,कलावंत कामगार मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला तसेच शेकडो गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्ष वाटप करण्यात आले.सर्व प्रथम पंचायत समिती समोरील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याठिकाणी सर्व महामानच्या जयघोषाने परिसर दणदनून गेला होता. तद्नंतर पंचायत समिती सभागृहात शोषित वंचित कलावंत ,कामगार मेळाव्याचे उदघाटन शिवसेना नेते प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी केले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.सिंधुताई तायडे होत्या. मेळाव्याला लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी धावती भेट देऊन समाजाला शुभेच्छा दिल्या .प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष सुधीर चेके पाटील,सौ.शमशादताई पटेल ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुभाष देव्हडे, ऍड. गुणवंत नाटेकर ,नगरसेवक दत्ता सुसर, मा. नगरसेवक शाम शिंगणे,भाजप उपशहर प्रमुख हरिभाऊ परिहार,गणेश यंगड, समतादूत मोहसीन खान, नितीन साळवे, शेषराव साळवे,प्रदीप साळवे, उपसरपंच भरत जोगदंडे, मिझान ग्रुप अध्यक्ष उबेद अली खान , सरपंच मधुकर बोरकर, रामदास कांबळे, कोंडुजी गायकवाड, युवा नेते राजेश पवार, मनोज जाधव,पत्रकार संतोष जाधव अन्य मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांची समाजाला भाषणातुन मार्गदर्शन केले. तर प्रमुख उपस्थिती म्हणून रवी पेटकर, बंटी कपूर, मारोती तायडे, ओंकार नाटेकर, अर्जुन तायडे,गजानन साळवे,अशोक साबळे,रामकृष्ण साळवे, विलास गायकवाड, तानाजी साळवे,विनोद खंदारे, कृष्णा साळवे ,विनोद चव्हाण, विनोद कायस्थ,गोपाल वाळेकर , ज्ञानेश्वर घाडगे, सागर कांबळे गोपाल साबळे यांच्यासह अनेक जण हजर होते. कार्यक्रमात सर्व जेष्ठ मंडळींचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमात चिखली तालुका सकल मातंग समाज उपस्थित होता. या कार्यक्रमाचे आयोजन छोटु कांबळे यांनी केले होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विनोद गणेशकर सर यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे स्वागतकर्ते अंकुशराव तायडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी दिलीप काळे, योगेश साळवे,रमेश घाडगे, सचिन कांबळे, किरण बोरकर अनिल तायडे, सागर गायकवाड, चैतन घाडगे, वैभव तायडे, राहुल तायडे सागर खरात,अजय खरे, सोमेश घाडगे, नितीन गायकवाड,अमोल साबळे यांच्यासह तालुक्यातील अनेक तरुणांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर गोदावरी अर्बनने महाप्रसादाचे वाटप केले.

Total Page Visits: 37 - Today Page Visits: 1

Akshada

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!