Breaking NewsMaharashtra

भारताची ‘बॅडमिंटनक्वीन’ पी.व्ही सिंधूनं जिंकलं कांस्य पदक, चीनी खेळाडूला नमवलं; रचला इतिहास

मोहन चौकेकर

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनं कांस्य पदकाची कमाई केली आहे. सिंधूनं चीनच्या बिंग जिओ विरुद्धच्या सामन्यात २१-१३, २१-१५ असा खणखणीत विजय प्राप्त करत पदकावर नाव कोरलं आहे.
पी.व्ही.सिंधूनं सामन्यात सुरुवातीपासूनच मजबूत पकड निर्माण केली होती. पहिल्या सेटची सुरुवात दमदार करत सिंधूनं ४-० असा दबाव चीनच्या बिंग जिओवर निर्माण केला होता. पण त्यानंतर चीनच्या बॅडमिंटनपटूनंही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि कमबॅक करत ५-५ अशी बरोबरी साधली होती. सिंधूनं त्यानंतर आपल्या भात्यातील सुरेख फटक्यांचा नजराणा पेश करत चीनच्या बिंग जिओवर पकड निर्माण केली. पी.व्ही.सिंधूनं पहिला सेट २१-१३ असा दिमाखात जिंकला.
दुसऱ्या सेटमध्येही सिंधूनं आपला दबदबा कायम राखत दमदार सुरूवात केली. दुसरा सेट १०-७ असा आघाडीवर सिंधू होती. त्यानंतर चीनी खेळाडूनं चिवट खेळाचं दर्शन घडवत जबरदस्त कमबॅकही केलं. दुसरा सेट ११-११ असा रोमांचक स्थितीत पोहोचला. त्यानंतर सिंधूनं वाऱ्याच्या वेगानं शटल फटक्यांचं दर्शन घडवत चीनी खेळाडूला अवाक् करुन सोडलं. चीनी खेळाडूच्या फूटवर्कवर बारकाईनं लक्ष देत सिंधूनं तिची कमकुवत बाजू हेरली आणि पुढील चार पॉइंट आपल्या खात्यात जमाले. सिंधूनं १५-११ अशी आघाडी घेतली. पुढे सिंधूनं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत दुसरा सेट २१-१५ नं जिंकून कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.

Total Page Visits: 45 - Today Page Visits: 1

Akshada

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!