Home and abroadMaharashtra

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 99.53 टक्के, 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण 

 

*आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा बारावीचा निकाल 99.53 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के, कला शाखेचा निकाल 99.83 टक्के, तर वाणिज्य* शाखेचा निकाल 99.91 टक्के लागला आहे.

*राज्यातील 46 विद्यार्थ्यांना 100 पैकी शंभर टक्के गुण मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचा निकाल मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी जाहीर केला.*

*आज दुपारी 4 वाजता* *बोर्डाच्या* *अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट आउटही काढता येणार आहे.*

*विभागनिहाय टक्केवारी :*

▪️ *राज्यात सर्वाधिक निकाल* *कोकण विभागाचा : 99.81 टक्के*
▪️ *दुसऱ्या क्रमांकावर मुंबई विभाग : 99.79 टक्के*
▪️ *पुणे : 99.75 टक्के*
▪️ *कोल्हापूर : 99.67 टक्के*
▪️ *लातूर : 99.65 टक्के*
▪️ *नागपूर : 99.62 टक्के*
▪️ *नाशिक : 99.61 टक्के*
▪️ *अमरावती : 99.37 टक्के*
▪️ *औरंगाबाद : 99.34 टक्के* 

Total Page Visits: 72 - Today Page Visits: 3

Akshada

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!