Breaking NewsMaharashtra

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांचे निधन

चिखली:

मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे बंधु तथा माजी आमदार सौ रेखाताई खेडेकर यांचे दीर , जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष पुरुषो्त्तम आण्णा खेडेकर यांचे शनिवारी ३१ जुलै रोजी निधन झाले. अंत्रीखेडेकर या जन्म गावातुन आपल्या राजकीय जीवनाला सुरवात करुन अंत्रीखेडेकरचे सरपंच ते जिल्हापरिषदेच्या उपाध्यक्षपदा पर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत खरतड असला तरी त्यांच्या कामाने आणि स्वभावामुळे त्यांनी सुखर केला होता.दि ३१ ला त्यांची प्रक्रुती खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्याठिकाणी उपचारादरम्यान सकाळी १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
राजकारणात राहुन समाजकारण करण्यातच रमणारे पांडुरंग अण्णा खेडेकर यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदा पासुन केली आणि त्यानंतर त्यांची अंत्रीखेडेकरच्या सरपंचपदी निवड झाली.त्यानंतर त्यांनी जनतेच्या संपर्कात राहुन मोठा जनसंपर्क वाढवत आपल्याला केवळ राजकारणच नाही तर समाजकारण देखील करायचे म्हणुन प्रत्येकाच्या मनावर ठसा उमटवला. चिखली बाजार समितीच्या उपसभापती पद देखील त्यांनी सक्षमपणे सांभाळले. जिल्हा परिषदेच्या विजया नंतर त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी मोठ्याप्रमाणावर जनसंपर्क वाढवून त्यांंच्या कार्यकाळात हागणदारीमुक्त अभियानाची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी अनेक गावांना भेटी देत ग्रामीण विकासाला चालणा दिली.त्यांच्या पश्क्षात पत्नी ऊषाताई , चिखली बाजार समितीचे माजी संचालक मनोजभाऊ खेडेकर व अमोल खेडेकर ही दोन मुले , मुलगी प्रा. डॉ मंगल कुटे , सुना ,नातवंडे असा मोठा आप्त परीवार आहे. शिवसेना तालुका प्रमुख कपिल खेडेकर यांचे काका होते. त्यांच्या ३१जुलैला झालेल्या अत्यसंकाराला व आज २ आॅगस्ट रोजी झालेल्या सावडण्याच्या कार्यकमाला सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते व असंख्य नागरिक हजर होते.

Total Page Visits: 31 - Today Page Visits: 2

Akshada

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!