Breaking NewsMaharashtraState

सार्वजनिक व सर्वांगीण विकासासाठी शिवसेना मुस्लिम बांधवांसोबत — आमदार अंबादास दानवे

महेश सारणीकर

संभाजीनगर / औरंगाबाद दि. २९

समाजहिताचे विचार शिवसेनेचे आहेत. येत्या काळामध्ये मुस्लिम बांधवानी खान पाहिजे की बाण या चर्चेत न पडता आपण शहर विकासाच्या बाजूने अधिक विचार करायला हवा. रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज या मूलभूत सोयी सुविधावर बोलण्याऐवजी अनेक इतर पक्षाचे काही लोकप्रतिनिधी घाणेरडे राजकारण करून शिवसेना जातीयवादी असल्याचा खोटा प्रचार करत आहे. विकासकामे सोडून हिंदू-मुस्लिम असा वाद जाणून बुजून निर्माण करत आहे. त्यामुळे अशा राजकारणी लोकप्रतिनिधी पासून दूर राहण्याचे आवाहन करत सार्वजनिक व सर्वांगीण विकासासाठी शिवसेना मुस्लिम बांधवांसोबत असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी पूर्व मतदारसंघात रोशनगेट, किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, शरिफ कॉलनी येथे शिवसंपर्क मोहिमेनिमित्ताने आयोजित आढावा बैठकीत केले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, विधानसभा संघटक राजू वैद्य, उपशहरप्रमुख, शिवा लुंगारे विभागप्रमुख वहाब हुसेन, सुनील धात्रक, उपविभागप्रमुख संतोष रताळे, शेख सत्तार शेख नूर, शेख आबेद, फारुख खान, शाखाप्रमुख सचिन गोखले, जयस्वाल,  शेख जमील, मोहम्मद हनीफ, रिजवान कुरेशी, शेख फारुख, मोहसीन अफजल शेख, समीर कुरेशी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

सुरानानगर, नवाबपुरा, संजयनगर, खास गेट, भवानीनगरातील शिवसैनिकांशी शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी साधला संवाद. शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने आयोजित बैठकीत गुरुवारी (दि.२९) संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील सुराना नगर, नवाबपुरा, संजय नगर, खास गेट भवानी नगरातील शिवसैनिकांशी आमदार अंबादास दानवे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी संघटनात्मक पक्षबांधणी, शाखा प्रमुख नियुक्त्या, वार्ड रचना बुथ रचना, बुथप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख यांच्या नियुक्त्या, पदाधिकारी नागरिकांच्या अडीअडचणी, कोरोना मुक्त वार्ड याविषयी आढावा घेत शिवसैनिकांना मार्गदर्शन व सुचना केल्या. याप्रसंगी उपशहरप्रमुख जयसिंह होलिये, विभागप्रमुख नरेश भालेराव, उपविभाग प्रमुख अनिकेत राठोड, नवनाथ महानोर, गणेश कुलकर्णी, बळीराम देशमाने, आकाश घोडके, शाखाप्रमुख वैभव सालपे, सोमनाथ धायगुडे, अक्षय बसये, अशोक महानोर, साहेबराव मानकापे, संजय शिंदे, रवींद्र कोलते, गणेश शेळके, कृष्णा साबळे, मनोज मुसळे, रोहिदास बनसोड, राजेश जाजू, हेमंत सरोदेआदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Page Visits: 33 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!