Breaking NewsMaharashtraState

भाजपा युवा मोर्चाची जबाबदारी हि राष्ट्र सेवेची पहिली पायरी – सागर पुरोहित

महेश सारणीकर

चिखली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने नुकतीच बुलढाणा जिल्ह्यामध्ये भारतीय युवा मोर्चाची कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देत युवा मोर्चाची जबाबदारी नवीन खांद्यावर सोपविल्याने पक्षनिष्ठ युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा वातावरण बघण्यास मिळत आहे. यादरम्यान भाजयुमो चिखली शहराध्यक्ष पदावर नियुक्ती मिळणे म्हणजे राष्ट्रसेवेची पहिली पायरी पक्षाने मला उपलब्ध करून दिली असल्याने मी आमदार श्वेताताई महाले पाटील आणि पक्षश्रेष्ठींचा आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया युवा नेते भाजयुमो चिखलीचे नवनियुक्त शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी दिली आहे.

येत्या काही दिवसात जिल्हाभरात नगरपालिकेचे निवडणूक होऊ घातले आहे. याकारणाने पक्षश्रेष्ठींनी अंतर्गत महत्वपूर्ण बदल करत नवीन चेहऱ्यांना महत्वाचे पद दिले आहेत. यातच बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेल्या चिखली शहराची युवा मोर्चाची जबाबदारी सागर पुरोहित यांना देण्यात आली असून त्यांच्या या निवडीमुळे एक अतिशय चांगले सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांस व योग्य युवा नेतृत्वाला संधी देण्यात आली असल्याचे शहरात बोलल्या जात असून समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संपुर्ण चिखली शहरात सागर पुरोहित यांची ब्लड मैन म्हणून ओळख आहे. त्यांनी शिवबा मित्र मंडळ व मानव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम नेहमी राबविले असुन यामध्ये विशेष करून अनेक वेळा रक्तदान शिबीरे चिखली शहरामध्ये घेतली होती त्यामुळे असंख्य नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी मदत झाली होती व त्यांना जीवदान मिळाले होते. सागर पुरोहित यांच्या निवडी वैशिष्ट्य हे आहे की चिखली शहराच्या इतिहासात प्रथमच सर्व विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनीसुद्धा संपूर्ण शहरभर शुभेच्छांचे होर्डिंग चिखली शहरात लावले असल्याचे बघण्यास मिळाले. यानिमित्ताने एक सोज्वळ व मनमिळाऊ व्यक्तीमत्व असलेल्या व सर्वांना घेऊन चालणाऱ्या कार्यकर्त्यांला, होतकरू, इमानदार आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या सागर पुरोहितवर पक्ष श्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास म्हणजे भारतीय जनता पार्टीत युवकांसाठी आकर्षण आणि नवीन संधी देणारा ठरणार असल्याचे दिसून येते. यावेळी बोलताना भारतीय जनता युवा मोर्चाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष सागर पुरोहित म्हणाले की पक्षाने जी माझ्यावर जवाबदारी सोपवली त्याद्वारे चिखली शहरात भारतीय जनता पक्षाचे पक्षसंघटन मजबूत करुन युवा कार्यकर्त्यांची एक चांगली व मजबूत फळी निर्माण करणार व त्याद्वारे चिखली शहरातील नागरिकांची विविध कामे करणार असल्याचे व याद्वारे आपल्या पदाला न्याय देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Total Page Visits: 36 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!