Maharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हणण्यापेक्षा ‘चहावाल्याचा मुलगा’ म्हणा; पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदींचा सल्ला

गौरव बुट्टे : प्रतिनिधी

उल्हासनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चहावाला’ म्हणण्यापेक्षा ‘चहावाल्याचा मुलगा’ म्हणा, असं म्हणत खुद्द नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी पत्रकारांना चिमटे काढले. चहा आम्ही सर्व भावंडांनी विकला, पण ज्याचा मुकुट मोठा, पत्रकार त्यालाच चालवतात, असं प्रल्हाद मोदी म्हणाले. प्रल्हाद मोदी हे आज उल्हासनगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी उल्हासनगरला आले होते. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा असं प्रल्हाद मोदी म्हणाले. आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चायवाले के बेटे’ आहोत, असं ते म्हणाले. आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा 6 भावंडांना मोठं केलं, पण पत्रकार नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हणतात, ही त्यांची चूक असून म्हणायचं असेल, तर त्यांना ‘चहावल्याचा मुलगा’ म्हणा, असं प्रल्हाद मोदी म्हणाले. त्यामुळे प्रल्हाद मोदींनी चिमटा नेमका पत्रकारांना घेतला, की स्वतःला ‘चहावाला’ म्हणवून घेणाऱ्या नरेंद्र मोदींनाच घेतला? अशी कुजबुज सभागृहात रंगली होती.

Total Page Visits: 35 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!