Breaking News

आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते मुंबई नागपूर महामार्ग ते गवळी शिवरा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

महेश सारणीकर

संभाजीनगर / औरंगाबाद : मुंबई -नागपूर महामार्ग ते गंगापुर तालुक्यातील गवळी शिवरा पर्यंत रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन आज (दि २९ जुलै) शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आला .
गवळीशिवरा व आजूबाजूच्या परिसरातील गावातील नागरिकांना चांगला रस्ता नसल्यामुळे रहदारीचा प्रश्‍न निर्माण झाला होता परिसरातील नागरिकांना येण्याजाण्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता या रस्त्या संदर्भात वेळोवेळी त्यांनी आमदार अंबादास दानवे यांच्याकडे हा रस्ता होण्यासाठी पाठपुरावा करत होते. याची तात्काळ दखल घेऊन आमदार दानवे यांनी विशेष प्रयत्नाने सदरील रस्ता मंजूर करून त्वरित मजबुतीकरण व डांबरीकरण कामाला सुरुवात केली.

रस्त्याचे काम तातडीने सुरु केल्यामुळे या पंचक्रोशीतील नागरिकांनी आमदार अंबादास दानवे यांचे विशेष आभार मानले याप्रसंगी कृष्णा पाटील डोणगावकर, जि प सदस्य प्रशांत बनसोड, सभापती सुनील केरे, उपतालुका प्रमुख बाळासाहेब चव्हाण, रमेश निचित, ज्ञानेश्वर नवले, दादा पाटील कापसे, ग्रामपंचायत सदस्य नितीन कांजुने, सरपंच रऊफ पटेल, विभागप्रमुख सुनिल पोळ, प्रदीप सोनवणे, पोपट नरवडे, विजय काकडे, नारायण ठोळे, दिगंबर गवळी, पुंडलिक मिसाळ, महारुद्र हनुमान मंदिर संस्थानचे विश्वस्त शांताराम पाटील केरे, सुखदेव गवळी, विलास पांडे आदींसह परिसरातील नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.

Total Page Visits: 36 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!