Breaking News

अर्ध्या रात्री रुग्णांच्या सेवेसाठी शिवसैनिक गोरगरिबांच्या मदतीला धावतो — आ. अंबादास दानवे

महेश सारणीकर

संभाजीनगर / औरंगाबाद | दि.२९

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे हे आपण सर्वच मानतो मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन समाजातील प्रत्येक घटकाला अत्यावश्यक सेवेप्रसंगी अर्ध्या रात्री तत्पर राहून गोरगरिबांच्या मदतीला धावनारा आहे तो फक्त शिवसैनिकच असे मत व्यक्त करून शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी स्फुर्ती निर्माण केली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिडको एन ६ येथे माजी महापौर विमल राजपूत, व किशोर राजपूत यांच्या सौजन्याने रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार दानवे बोलत होते. शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख
आमदार मा. अंबादासजी दानवे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी विशेष अतिथी मा. अॅड बी.एल. सगर किल्लारीकर. (सदस्य महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग).

प्रमुख अतिथी पूर्व विधानसभा संघटक मा. राजू वैद्य, शहर प्रमुख मा. विश्वनाथ स्वामी तसेच उपशहरप्रमुख अनिल जैस्वाल मकरंद कुलकर्णी, राजेंद्र दानवे, शिवा लुंगारे माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, मारुती साळवे युवा सेना उपजिल्हा अधिकारी गणेश तेलोरे विभागप्रमुख रघुनाथ शिंदे, चंद्रकांत गवई, अंकुश देवरे, विलास राऊत, मोतीराम सुरडकर, सोपान बांगर, मधुकर वाघमारे, रमेश ठोंबरे, पंकज पाषाण, अनिल बरडे, राजू बदर, अरुण गव्हाड, मोहित श्रीवास्तव, अरविंद कामतिकर, चेतन सिंगरे, संदीप वेताळ, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक विद्याताई अग्निहोत्री, उपशहर संघटक अॅड अंजनाताई गवई, सीमाताई गवळी, राखीताई सुरडकर, पंचकलाताई काळे, सविता ताई चव्हाण, रुक्मिणी ताई किरदत्त, सुंदर ताई सुपारे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन शाखाप्रमुख बद्रीनाथ ठोंबरे यांनी केले.

Total Page Visits: 39 - Today Page Visits: 2

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!