Breaking NewsMaharashtra

वन्य प्राण्यांपासून शेतपिकाचे नुकसान होऊ नये म्हणून उपाय योजना करा — शेतकारी नेते संतोष परिहार

मोहन चौकेकर

चिखली.- वन्य प्राणी शेतकऱ्यांचा शेतमाल खाऊन त्यांचे खुप मोठे नुकसान करतात अश्यावेळी वनविभाग नुकसान भरपाई देते मात्र ती मदत ही तोडकी असते अश्या वेळी नुकसानच होणार नाही अश्या उपाय योजना करा अशी मागणी शेतकरी नेते संतोष परिहार यांनी केली आहे.
शेतकरी उन्हाळ्यात शेताची मशागत करतो. चांगल्या दर्जाचे बियाणे घेतो खते टाकून मानसूनचा अंदाज घेत पेरणी करतो पण नशिबाने साथ देऊन जेव्हा हे पीक शेत शिवारात डोलू लागते तेव्हा रोही, हरीण या सारख्या वन्य प्राण्यांकडून त्याचा फडश्या फाडल्या जातो तेव्हा त्या शेतकऱ्यावर काय बितत असेल याचा ही विचार व्हावा. पिकावर कीड आली अळी आली तर शेतकरी भारित भारी औषध मारून त्याचा नायनाट करतो पण रोही , हरीण या वन्य प्राण्यांपुढे तो हतबल ठरतो पाण्या पावसात शेत राखणे म्हणजे मज्जाक नव्हे एव्हढे करूनही रोही शेतात आल्यास त्याला फक्त हुसकावणे हेच करता येते कारण वनकायदे खुप कठोर आहेत अश्या वेळी शेतकऱ्यांना या वन्य प्राण्यांचा त्रासच होऊ नये म्हणून आपण योग्य उपाय योजना कराव्या अशी मागणी शेतकरी नेते संतोष परिहार यांनी जिल्हा उपवनसंरक्षक गजभिये यांच्या कडे केली आहे. यावेळी शासन नियमांच्या अधिन राहून योग्य उपाय योजना राबवण्याची ग्वाही गजभिये साहेबांनी दिली आहे. 

Total Page Visits: 40 - Today Page Visits: 1

Akshada

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!