Breaking NewsMaharashtra

शिवसेनेचे विचार, कार्यपद्धती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे म्हणजे शिवसंपर्क मोहीम — आमदार अंबादास दानवे 

मोहन चौकेकर

संभाजीनगर / औरंगाबाद : शिवसेना पहिले सामाजिक संघटना आणि नंतर राजकीय पक्ष ज्यावेळेस राजकारण करायचे त्यावेळेस पक्षप्रमुखांच्या आदेशाने आपण करूच पण त्याआधी नागरिकांचे प्रश्न अडचणी सोडवण्याला प्रत्येक शिवसैनिकांनी प्राधान्य द्यावे पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावापुरती बैठक घेणे म्हणजे शिवसंपर्क मोहीम नसून प्रत्येक पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक यांनी वार्डातील घराघरात जाऊन शिवसेनाप्रमुखांचे विचार, शिवसेनेचे विचार, शिवसेनेचे कार्यपद्धती ,शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत होणारे विकासकामे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवणे त्यांच्या मनावर बिंबवणे म्हणजे शिवसंपर्क मोहीम आहे आणि हेच कार्य प्रत्येक शिवसैनिकाने करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी शिवसंपर्क मोहिमेच्या बैठकी प्रसंगी केले.

आज शिवसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून संभाजीनगर मध्य शहरातील भारतमाता नगर, वानखेडेनगर, यादवनगर, सुदर्शन नगरयेथील पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी आढावा घेतल्या पक्षाचे कार्य करत असतांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना सूचना व मार्गदर्शन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल पौलकर, आनंद तांदुळवाडीकर शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी माजी नगरसेवक नगरसेवक मोहन मेघावाले स्वाती नागरे, सीमाताई खरात, उपशहरप्रमुख गणपत खरात, महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार, सुनीता देव, प्राजक्ता राजपूत, विधानसभा संघटक नलिनी महाजन विभागप्रमुख मनोज मेठी शिरसाट मामा शाखाप्रमुख ज्ञानेश्वर शेळके बाबासाहेब घुगे सचिन गायके युवा सेना उपशहर अधिकारी सागर भारस्कर सागर खरात उपविभागप्रमुख विनोद पाटील मकरंद पुराणिक नारायण मते राजू इंगळे विजयराव घुले उपशाखाप्रमुख सागर धुमाळ इंद्रजीत वाघ बबलू कासलीवाल
गट प्रमुख गणेश धामणे राम कुलकर्णी विजय सद्भावे संदीप लहाने संदीप घुले कपिल खादी दीपक भावसार बंटी परदेशी
शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
त्याचप्रमाणे श्रीकृष्णनगर पवननगर शिवनेरी कॉलनी विवेकानंद नगर या ठिकाणी उपशहर प्रमुख संदेश कवडे विभाग प्रमुख राजू अहिरे नारायण आगाव संजय रगडे उपविभाग प्रमुख राहुल सोनवणे संदीप कुमावत विलास सोनवणे लक्ष्मण पद्मने विक्रम बोंबले शाखाप्रमुख गजानन टेहरे प्रतीक अंकुश योगेश काळे कीर्ती काका अतिश जयस्वाल बाबासाहेब घुले आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Page Visits: 43 - Today Page Visits: 1

Akshada

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!