Breaking NewsMaharashtra

वालसावंगी गावातून  देशी  दारुची सर्रास  वाहतूकराज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

वालसावंगी: प्रतिनिधी 

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी  गावातून सर्रास  मोठ्या प्रमाणात देशी दारूची बॉक्सची मोठ्या प्रमाणात  वाहतूक वाढली असून याकडे स्थानिक पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभाग जालना यांचे सर्रास दुर्लक्ष  होत असल्याचे चित्र वालसावंगी  गावात दिसून येत आहे  वालसावंगी हे गाव भोकरदन तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असून गावात परवाना धारक देशी दारूची दोन दुकाने असून  दुकानातून  दररोज रात्रभर  वालसावंगीसह , वाढोणा ,विझोरा , धावडा , वडोदतांगडा , शेलूद आदी ठिकाणी  मोठ्या प्रमाणात दारूचे बॉक्स वाहतूक केली जात असताना  मात्र पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही  प्रकारची कारवाई केली जात नसल्याने   परिसरात अवैध दारुविक्रेत्यांसह अवैध धंदेचालकांची  दादागिरी वाढली असल्याचे चित्र  वालसावंगी व परिसरातील खेडेगावात दिसून येत आहे  तसेच  गावात  दारूच्या व्यसनामुळे शाळकरी मुलांचे भविष्याचे वाटोळे होत असून अनेक महिलांचे संसार उघड्यावर येत असून पोलीस प्रशासनाने दारू वाहतूक करणार्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.  

Total Page Visits: 48 - Today Page Visits: 1

Akshada

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!