Breaking NewsMaharashtra

कै. एकनाथराव घुगे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त वृक्षांची लागवड करून मुलांनी राबविला सामाजिक उपक्रम

वडीलाच्या 15 व्या पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम रद्द करून भराडखेडा गावांमध्ये लावली 101 ऑक्सिजन देणारी वृक्ष

जालना जिल्हा प्रतिनिधी – गौरव बुट्टे

भराडखेडा गावचे माजी सरपंच तथा गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर राहिलेले कै. एकनाथराव घुगे यांची काल 15 वी पुण्यतिथी असल्यामुळे दरवर्षी मोठा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो परंतु गेल्या तीन वर्षापासून कै. एकनाथराव घुगे यांचे चिरंजीव तथा युवासेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी धार्मिक कार्यक्रमाला फाटा देऊन गावांमध्ये दरवर्षी 101 वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली या वर्षी वडिलांच्या 15 व्या पुण्यतिथीनिमित्त गावामध्ये 101 ऑक्सिजन देणारी वृक्ष लावली त्यामध्ये वड, पिंपळ, कडुलिंब, करज, गुलमोहर, उंबर, उंबर यासारखी झाडे लावून त्याचे जतन व संवर्धन व्हावे म्हणून झाडाभोवती लोखंडी जाळी लावली त पाण्याच्या व्यवस्थेसाठी ठिबक सिंचन करून देण्यात आले साठी एकनाथराव घुगे य यांचे चि. भाऊसाहेब घुगे कार्यकारी अभियंता कृष्णा घुगे शाखा अभियंता अशोक घुगे यांनी पुढाकार घेऊन दरवर्षी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गाव परिसरामध्ये वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला मागील वर्षी करोना काळामध्ये गावातील गरीब काबाडकष्ट करणारे मजूर यांना किराणा सामानाचे किट चे वाटप करण्यात आले होते त्यासोबत मास्क, सॅनिटायझर चे वाटप करून निर्जंतुकीकरणासाठी गावामध्ये सोडियम क्लोराइड ची फवारणी सुद्धा करण्यात आली होती गावातील रस्त्याच्या दोन्ही कडेला ,शनि मंदिर परिसरामध्ये, शाळा परिसरामध्ये ,रुग्णालय परिसरामध्ये ,दलित वस्ती स्मशानभूमीमध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये युवा सेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे नगरसेवक गणेश घुगे गावचे सरपंच भगवान बारगजे, बाबासाहेब दराडे, समाधान दराडे, हरिदास घुगे, राधाकिसन घुगे, रामेश्वर दराडे, विलास तुपे, पोलीस पाटील दत्तात्रय दराडे, वसंतराव मुळे, गोपीनाथ मुलक, बाबासाहेब राऊत ,राजेंद्र वरपे, दिनेश दराडे, अंकुश जावळे, किशोर मुळक, बद्री मुळक ,बाळू ढाकणे, यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती

Total Page Visits: 148 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!