Breaking News

सकारात्मक विचार करून कोरोनावर मात करू शकता-राजेश दिवटे.

बीड/प्रतिनिधी:दि.27

आज महाराष्ट्र मध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे हे जरी खरं असलं,तरी झपाट्याने रुग्ण बरे होत आहेत हे देखील खर आहे परंतु अशा बातम्या फार कमी ऐकायला येतात. आज सर्वत्र नकारात्मक वातावरण तयार होत आहे, हे जाणून बुजून केल्याप्रमाणेच वाटत आहे, त्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून खूपच भयानक वास्तव दाखवलं जात आहे आणि ते पाहून आज अनेक रुग्ण घाबरून आपला जीव सोडून देत आहेत, खरंतर आपल्या मानसिकतेवर काम करणे जास्त गरजेचे आहे मानसशास्त्र असे म्हणतात की आपण जसा विचार करतो आपण तसेच बनतो आणि म्हणून सर्वांनी सकारात्मक विचार केला पाहिजे,कारण आज खऱ्या अर्थाने सकारात्मक विचारांची खरी गरज आहे, आज सोशलमीडिया ने जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ज्या लोकांना असे वाटते की आपला कोरोनाची लागण झाली आहे अशा व्यक्तीने सकारात्मक विचार केला पाहिजे. सकारात्मक बातम्या बघितल्या पाहिजे
सोबत पोस्टीक आहार घेणे,योगासने,व्यायाम करणे दैनंदिन जीवनामध्ये एकमेकांशी फोनवर बोलत असताना देखील सकारात्मक चर्चा केली पाहिजे,
आणि तरच आपण बरे व्हाल.सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांनी देखील तकोरोना काळात राजकारण न करता सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न सोडवला पाहिजे. सर्व नागरिकांना मोफत लसीकरण करून या कोरोनाच्या संकटातून मुक्त केले पाहिजे.

Total Page Visits: 51 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!