Breaking News

तुमचे विचारच तुमची ताकद आहे.माधव निर्मळ.

बीड/प्रतिनिधी:दि.27

कोरोना काळात अनेक विचार वारंवार एकल्याने फोबिया ( भयगंड ) या आजाराने कहर केला आहे . घशात नुसती खवखव झाली तरी मनाचा अँन्टेना कोरोना कडे वळतो . मग अनेक नकारात्मक विचार मनात थैमान घालतात इतके की कोरोना जरी झाला नसला तरी तुमचा मेंदु त्याला साद देतो आणि व्यक्ती कोरोनाग्रस्त होत . आपल्या मेंदुत सरासरी 70 हजार विचार येतात , आपल्या मेंदुत अब्जावधी पेशी असतात ह्या एकमेकांना जोडल्या तर संपूर्ण प्रुथ्वीला प्रदक्षीणा होईल एवढी ताकद आपल्या मेंदुत असते .
लक्षात घ्या मेंदुच खाद्य हे आपले विचार असतात मग तुम्हीच नकारात्मक विचारांच्या वादळात स्वतःला अडकवतात आणि मग जे होणार नाही ते ही होत . एवढी ताकद आपल्या मेंदुत असते .अशा विचारांनी तुमच्या मेंदुतील सिसोटोनिन ,नाँरएपिनेफ्रीन ,डोपामाईन आणि गँमा यांच्यातला तोल बिघडला की व्यक्ती भावना भयग्रस्त होऊन व्यक्ती कोरोना सोबत लढायला असमर्थ ठरते . म्हणून सर्व प्रथम घाबरु नका ,नियमांचे काटेकोर पालन करा . आपल्या विचारांची दिशा मला काहीच होऊ शकत नाही आणि झालाच तर मी कोरोनाला उरुन पुरेल .तुमची जगण्याची तिव्र इच्छा शक्तीच तुम्हाला बळ देईल …खरे तर स्वतःवरील श्रद्धा,विश्वास मनाची शक्ती वाढवतो . कोणत्याही आजाराची लागण झाली की मनाची शक्ती 70% काम करते आणि डॉ. चे औषधे 30% टक्के काम करते .एवढी शक्ती मनात म्हणजेच मेंदुत असते . तुम्ही समुद्राच्या लाटा थांबवू शकत नाही परंतु लाटांवर स्वार कसे व्हायचे हे मात्र शिकू शकतात म्हणून सकारात्मकता विचारशैली , हात धुणे ,सँनिटाइजर वापर ,मास्क चा वापर आणि कोरोनाची लस अवश्य घ्या आणि कोरोनाच्या लढाईत सुरक्षित स्वार व्हा…मी आज सपत्नीक जाऊन कोविड लस घेतलीआहे.आपण सर्वांनी लस घ्यावी हि विनंती

Total Page Visits: 52 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!