Breaking NewsMaharashtra

शहरातील व्यापा-यांनी आपल्या कुटुंबासहित कर्मचा-यांची अँटिजन टेस्ट करून घ्यावी जालना जिल्हा व्यापारी महासंघ एवं मारवाड़ी युवा मंच, जालना

जालना शहरातील व्यापारी असोसिएशनचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी तसेच सर्व व्यापारी बांधवांना सूचना करण्यात येते की जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व दुकानदारास आपल्या कुटुंबाची व आपल्या दुकानावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची आरटी- पीसीआर किंवा अँटिजन टेस्ट सक्तीची केलेली आहे.दुकानदाराने आपली , आपल्या कुटुंबाची तसेच दुकानावरील सर्व कर्मचाऱ्यांची आरटी- पीसीआर टेस्ट किंवा ऑंटीजन टेस्ट करून घेतली नाही तर त्या दूकानाच्या मालकावर आपत्ती निवारण व साथ रोग कायद्यानुसार कायदेशीर कारवाई जिल्हा प्रशासनाकडून होऊ शकते .व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून जिल्हा व्यापारी महासंघ, मारवाड़ी युवा मंच, जिल्हा परिषद व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 मार्च सोमवार रोजी शोभा प्रकाश मंगल कार्यालय(पोलीस काॅम्पलेक्स वाहतूक पुलिस ऑफिस, शाम लाॅज च्या बाजूला)येथे सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत आरोग्य विभागाच्या मदतीने अँटिजन टेस्ट करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.सर्व व्यापारी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान जालना जिल्हा व्यापारी महासंघ एवं मारवाड़ी युवा मंच तर्फे करण्यात येत आहे .

Total Page Visits: 12 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!