दामिनी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना ग्लमोन मिस इंडिया किताब.

जालना/प्रतिनिधी:दि.28
जालन्याच्या दामिनी पथकाच्या प्रमुखपोलीस उपनिरीक्षक यांनी या स्पर्धेतील फर्स्ट रनर अप पुरस्कार मिळाला आहे. जयपूर येथील आयोजित कार्यक्रमात 70 पेक्षा जास्त महिलां स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.यात महाराष्ट्रातील पल्लवी जाधव यांनी इतर स्पर्धकांना मागे टाकत हा पुरस्कार मिळवला आहे. पल्लवी जाधव या गत पाच वर्षापासून जालना येथे दामिनी पथकाचे पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत असून पूर्ण जालना जिल्ह्यात व ग्रामीण विभागात त्यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक आहे.जिल्ह्यातील शाळा कॉलेजला भेटी देऊन मुलींना,महिलांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन तुम्ही अबला नाही सबला आहे अशी त्यांची जिद्द निर्माण केली.मुलींना आत्म निर्भर, धीट व जिद्दी बनवण्यात त्यांचा हरखंडा असून जिल्हाभर त्यांच्या कार्याचा गौरव होत असतानाच हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे जिल्हाभर सर्व स्तरातून कौतुक होत आहे.