सुवर्णकार समाजाने संघटीत व्हावे- मंगेश लोळगे

जालना जिल्हा प्रतिनिधी गौरव बुट्टे
महाराष्ट्र राज्य लाडसोनार संघटनाचे युवाप्रदेशाध्यक्ष श्री. मंगेशजी लोळगे(बीड) जालना दौऱ्यावर आले असता श्री सत्यनारायणजी उदावंत जालना जिल्हा उपशाखा अध्यक्ष यांनी पुष्पगुच्छ,शाल देऊन स्वागत केले सामाजिक स्तरावर सुवर्णकार समाजाचा सर्वांगीण विकास, अडी अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नावर भर देणे समाज संघटित करण्यासाठी जोरदार तयारी करणे, शासन दरबारी समाजातल्या समस्या मांडणे, सुवर्णकार समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वसतिगृहे, राज्यशासनाच्या यादी नुसार 154 OBC सुवर्णकार जातप्रमाणपत्रा प्रमाणे केंद्र सरकारच्या यादी नुसार 237 या नुसार जातप्रमाणपत्र मिळावे जेणे करुन केंद्रीय पदभरती मध्ये समाजातील तरूणाना फायदा होऊ शकतो, समाजातील वृध्द ज्यांनी 60 वर्ष पूर्ण केले असे कारागिर यांना किमान 5000 हजार मानधन मिळावे, श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या नावाने टपाल तिकीट,रूपया काढले जावे, राष्ट्रीय संत म्हणून घोषित करण्यात यावे. अशी अनेक मागण्यासाठी शासनाकडे मागणी करणार आहे असे श्री.मंगेशजी लोळगे म्हणाले यावेळी जालना तालुका अध्यक्ष नारायणराव बुट्टे , विष्णु बोंद्रे, सुजितशेठ मैड
(राज्य प्रसिध्दी प्रमुख )
सुनिलशेठ बोऱ्हाडे मामा (देवळाली प्रवरा)
(राज्य प्रसिध्दी प्रमुख)
रमणजी जोजारे
(बीड जिल्हा.प्रसिध्दी प्रमुख) रेणुका ताई महाले
(संगमनेर)(राज्य प्रसिध्दी प्रमुख )
संदीपजी बोंदरवाल
बारा बलुतेदार समाज विकास संघाचे जिल्हाध्यक्ष तथा माहिती अधिकार व पत्रकार सरंक्षण समिति, पोलिसमित्र फाउंडेशनचे जालना जिल्हाध्यक्ष तसेच इतर मान्यवर उपस्तीत होते