माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीसमित्र फौंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलीसमित्र समिती पदाधिकारी मेळावा
महेश सारणीकर : मुख्य संपादक

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीसमित्र फौंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलीसमित्र समिती या दोन आघाड्या स्थापन करण्यात आल्या आणि काल दिनांक २४ जानेवारी २०२१ रविवार रोजी कला व वाणिज्य महाविद्यालय, राधिका चौक, राजवाडा येथे नयन रम्य सोहळा आयोजित करण्यात येवून माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीसमित्र फौंडेशनसह माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलीसमित्र समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला.
उद्घाटनपर पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, संघटना स्थापनेचे उद्घाटन, लोगोचे प्रकाशन तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार आणि नूतन पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. त्याबरोबरच वरील दोन्ही समितीसह पर्यावरण संरक्षण समिती आणि माथाडी कामगार संरक्षण समिती यांची घोषणा करण्यात आली.
सदरील मेळाव्यास राष्ट्रीय कार्यकारिणीतील राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपक कांबळे, आणि राष्ट्रीय महासचिव श्री कमलेश शेवाळे, सह माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या राज्य कार्यकारिणीतील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री महेश सारणीकर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री अमर बेंद्रे, श्री पुष्कर सराफ व श्री उमेश काशीकर, महाराष्ट्र राज्य सचिव श्री इद्रीस सिद्दिकी, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री सखारामपंत कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख श्री सुभाष भोसले, महाराष्ट्र राज्य संघटक श्री दिनेश शिंदे, महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक श्री निजाम पटेल आणि महाराष्ट्र राज्य सहसंपर्कप्रमुख श्री सागर पाटील हे उपस्थित होते, तसेच सर्व विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणीसह तालुका कार्यकारिणीचे सभासद उपस्थित होते. त्याबरोबरच पोलीसमित्र समितीच्या राज्य कार्यकारिणीतील महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री वजीर शेख, महाराष्ट्र राज्य सचिव श्री पुष्कर सराफ, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री जावेद सय्यद बरोबर पोलीसमित्र समितीचे विभागिय पदाधिकारी आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री महेंद्रकुमार देशमुख सह विविध जिल्ह्यातील आणि तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महेश सारणीकर यांनी केले, विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर भाषणात संघटनेची गरज, संघटन करणे किती गरजेचे आहे जेणेकरून विविध विषय संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे मांडणे कसे आवश्यक आहे, याबरोबरच माहिती अधिकार कायदा, नागरिकांचे हक्क, भ्रष्टाचार निर्मुलनासाठी माहिती अधिकाराचे महत्व, अर्जाचे प्रकार, अर्ज करण्याची पद्धती, त्यासंबंधीचे नियम, कालावधी, शुल्क आणि कार्यकर्ते यांना होणारा त्रास, अन्यायकारक कालावधी यावरील उपाय, आयोगाची कार्यपद्धती, कार्यकर्त्यांनी संयम पाळणे त्याबरोबरच लोकशाहीचा चतुर्थ स्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात काम करतांना येणाऱ्या अडचणी, पत्रकारितेची सामाजिक गरज, पत्रकारांची आर्थिक व सामाजिक पिळवणूक तसेच पत्रकारांना प्रशासनासह समाजाकडून होणारा त्रास आणि माहिती अधिकार कायदा, कार्यकर्ते आणि पत्रकारिते बरोबरच पत्रकारांचे संरक्षण करण्याच्या हेतूने सदरील दोन्ही विषय शासन दरबारी मांडण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार यांना संघटनेचे पाठबळ देवून वेळोवेळी कर्तव्य पार पडतांना येणाऱ्या अडचणी, समाज विघातक प्रवृत्तींकडून होणारे त्रास आणि त्यासंबंधी उपाययोजना यासंबंधी सुद्धा अनुभवी व्यक्ती कडून मार्गदर्शन मिळाले. ग्रामीण तरुणांना रोजगाराची उपलब्धता, पोलिसांना मदत आणि राष्ट्रसेवा हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवण्याची पोलीसमित्र समितीची उद्दिष्ट्ये यांची माहिती देण्यात आली. सूत्र संचालन श्री अमर बेंद्रे यांनी केले व अध्यक्षीय भाषणात श्री दिपक कांबळे यांनी मार्गदर्शन करून दोन्ही समित्यातील पदाधिकाऱ्याच्या प्रश्ने आणि अडीअडचणी समजून घेवून संबंधित उपाययोजना यांची माहिती दिली. सर्व प्रमुख पाहुणे, राष्ट्रीय सह महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि नियोजन समितीचे आभार मानले.
विशेष म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपक कांबळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री अमर बेंद्रे, सातारा जिल्हाध्यक्ष श्री आदेश गंगावणे सह सर्व सातारा जिल्हा कार्यकारिणी यांनी अपार कष्ट घेवून कार्यक्रमाचे नियोजन केले आणि त्यांनी कष्ट घेतले म्हणूनच इतका सुंदर कार्यक्रम होवू शकला हे सत्य आहे. अगदी नयनरम्य सोहळ्यासाठी सर्व नियोजन समितीचे मनःपूर्वक आभार आणि हार्दिक अभिनंदन, त्याबरोबरच पोलीसमित्र समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री महेंद्रकुमार देशमुख यांनी स्वतः व बरोबर असलेल्या पोलीसमित्रांनी कार्यक्रमाच्या शिस्तबद्धतेसाठी अथक परिश्रम घेतले. त्याबद्दल त्यांचे आभार, अशी माहिती महेश सारणीकर, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र यांचेकडून मिळाली.