माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या सातारा जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सौ. सोनाली चव्हाण यांची निवड

सातारा – प्रतिनिधी
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाऊंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी जिंती ता.पाटण येथील सौ. सोनाली चव्हाण यांची सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. माहिती अधिकार, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपक कांबळे, राष्ट्रीय महासचिव श्री कमलेश शेवाळे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री महेश सारणीकर, यांच्या संमतीने, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता गणेश शिंदे, महाराष्ट्र राज्य सचिव श्री इद्रीस सिद्दीकी महाराष्ट्र राज्य सह संपर्कप्रमुख सागर पाटील यांच्या शिफारसीने राष्ट्रीय लोकशाही विचारधारेला अभिप्रेत व लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य ही लोकशाही संकल्पना यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येयधोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवून अधोरेखित करण्याची जबाबदारी आपणावर सोपविण्यात येत आहे. संबंधित नियुक्तीस राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपक कांबळे, मित्रपरिवार व व्यापारीवर्गातर्फे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.