माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलिसमित्र समितीचे २४ जानेवारीला सातारा येथे राज्यस्तरीय अधिवेशन

सातारा प्रतिनिधी
सातारा दि- १५ जानेवारी
मनुष्य हा समाजशील प्राणी असून समाजात वावरताना त्याला अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागतो. समाजातील तळागाळातील लोकांवर होणारा अत्याचार अधिकारी वर्गाची दडपशाही विविध संस्थांमध्ये होणारा भ्रष्टाचार या सर्व गोष्टीवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवून त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल व संघटनेच्या मजबूत बांधणी साठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे राज्य स्तरीय अधिवेशन २४ जानेवारी रोजी सातारा येथे घेण्यात येणार असून पत्रकारावर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी व सर्व प्रकारच्या पत्रकारांना संरक्षण मिळावे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्यस्तरीय माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र समितीच्या सर्व पदाधिकारी यांची गुगल मीट द्वारे बैठक घेण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे यांनी दिली यावेळी २४ जानेवारी रोजी सातारा येथील राज्यस्तरीय मेळाव्याचे नियोजन या संदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यात आली असून या बैठकीत राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे साहेबांनी संघटनेचे उद्दिष्ट व कामकाज कशा प्रकारे करावे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर यांनी संघटनेच्या कामात पुढील काळात करावयाचे बदल व आपली संघटना कशाप्रकारे वाढवावी लागेल संघटनेची ध्येयधोरणे कशाप्रकारे अमलात आणता येतील याबद्दलची सविस्तर माहिती दिली माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण व पोलीस फाउंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलीस मित्र समिती च्या राज्यस्तरीय मेळाव्यास महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, याप्रसंगी प्रमुख पाहुणे वरिष्ठ पत्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते पोलीस मित्र यांची उपस्थिती प्रार्थनीय असणार आहे मेळाव्यादरम्यान सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्याचे योजले आहे तसेच संघटनेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी चा वापर करून पदाधिकाऱ्यांना वापरण्यासाठी मोबाईल ॲप तयार करून त्याचेही मेळाव्यादरम्यान ओपनिंग करणार आहेत व या प्रसंगी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र फाऊंडेशन ,माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती व पोलीस मित्र समिती या तीन चे लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे गुगल मीट द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे, राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे उपस्थित होते. आणि माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे मा. महेश सारणीकर (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष) मा सिद्दिकी इद्रिस (महाराष्ट्र सचिव) अमर बेंद्रे (महाराष्ट्र उपाध्यक्ष) पुष्कर सराफ (महाराष्ट्र उपाध्यक्ष )तुळशीराम जांभूळकर (महाराष्ट्र उपाध्यक्क्ष) उमेश काशीकर (महाराष्ट्र उपाध्यक्ष) दिनेश शिंदे (महाराष्ट्र संघटक) सुभाष भोसले (महाराष्ट्र संपर्कप्रमुख) राजाभाऊ आवारे (उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख )सुरेश संपकाळ, (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष) प्रशांत भोसले (पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष )गणेश भोसले (पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष )चांद भैय्या शेख (महाराष्ट्र समन्वयक )सौ श्वेता व्हनमाने (पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष )सौ सोनाली पोतदार (पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष )सौ शिल्पा बनपूरकर (चंद्रपूर जिल्हाध्यक्ष )पोपटराव कोळेकर (पश्चिम महाराष्ट्र सचिव )दिलीप जाधव (पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष) राजू कुलकर्णी (पुणे जिल्हा उपाध्यक्ष )नितीन गुरव (पुणे जिल्हाध्यक्ष) शेखर बडगे (अमरावती जिल्हा अध्यक्ष) आणि पोलीस मित्र समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. वजीर शेख व सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्रकुमार देशमुख उपस्थित होते.