पत्रकार दिनानिमीत्त न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयात पत्रकारांचा सन्मान
विनोद गायकवाड : निफाड (नाशिक)
आज रोजी दिनांक ९/१/२०२१ चांदोरी येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कुल मध्ये मराठी पत्रकार दिनानिमित्त परिसरातील विविध पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष देवराम आप्पा निकम हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सल्लागार समिती सदस्य माणिक शेठ गायखे हे होते. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सुभाष सोमवंशी यांचे हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ श्रीफळ व लघु वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. दैनिक बाळकडू पत्रकार राहुल कुलकर्णी, दैनिक बाळकडू पत्रकार विनोद गायकवाड, दैनिक सकाळचे पत्रकार सागर आहेर, दैनिक लोकमत चे पत्रकार आकाश गायखे, दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार आशिष गायखे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्राचार्यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांची याप्रसंगी पत्रकारांना माहिती दिली, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देवराम आप्पा निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले “पत्रकार हा समाज माध्यमांचा दूवा असतो, असे मत त्यांनी मांडले.यानंतर दैनिक सकाळचे पत्रकार सागर आहेर यांनी विद्यालयाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे उपशिक्षक वसंत टर्ले यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम मोरे यांनी केले.आभार किशोर गांगुर्डे यांनी मानले. याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक संजय शेटे, राजेंद्र टर्ले विष्णू कोरडे, शरद गडाख सुनील रासकर, भावेश मोहिते आदि. सेवक उपस्थित होते.