जालना शहरात दामिनी पथकाने थांबवला बालविवाह

जालना विशेष प्रतिनिधी
दामिनी पथक प्रमुख पोलिस उप निरक्षक पल्लवी जाधव यांना चाईल्ड हेल्प लाईन सदस्य अनिता दाभाडे हिने फोनद्वारे कळविले की, चाईल्ड हेल्प लाईन वर एक तक्रार आली आहे की, आज दुपारी 12 वाजे दरम्यान एका 12 वर्षीय मुलीचा विवाह 26 वर्षीय मुलासोबत इंदेवाडी गावात होणार आहे.
त्यावरून दामिनी पथक आणि चाईल्ड हेल्प लाईन सदस्य हे घटनास्थळी पोहचून त्यांनी मुलीची भेट घेतली.
तिला विचारपूस केली असता तसेच तिचे वयाचे प्रमाणपत्र बघितले असता ती 12 वर्षाची आहे याची खात्री झाली त्यावरून मुलीच्या व मुलाच्या पालकांना एकत्र घेवून त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदयाची माहिती दिली.
सदर मुलीचा विवाह 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय करता येणार नाही याबाबत पालकांना प्रतिबंधात्मक नोटिस देवून त्यांचे समुपदेशन केले.