Breaking NewsMaharashtra

विरेगाव जवळ भरधाव एसटी ची दुचाकीला धडक “दुचाकी वरील पती पत्नी ठार”

भोकरदन:प्रतिनिधी जुनैद पठाण

भोकरदन ते जाफराबाद रस्त्यावरील विरेगाव येथील पुलाजवळ औरंगाबाद हून मलकापूर कडे भरधाव जाणाऱ्या एसटी ने भोकरदन येथे लग्नाच्या कार्यक्रमास वालसावंगी येथून येणाऱ्या दुचाकीस जोराची धडक दिली. दुचाकी वरील पती पत्नी
ला दवाखान्यात उपचारासाठी नेले परंतु त्यांचा मृत्यू झाला.
वालसावंगी ता. भोकरदन येथील विष्णू त्रंबक गारुडी( वय 55) व त्यांच्या पत्नी मंगलाबाई विष्णू गारुडी (वय 50),हे आपल्या दुचाकीवर भोकरदन येथे आज दि 7 रोजी एका लग्नासाठी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान येत होते. विरेगाव जवळील पुलाजवळ आल्यानंतर औरंगाबाद-मलकापूर
(MH40N 9948) या एसटीने जोराची धडक दिली. दुचाकी वरील पती पत्नी ला जोराची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दोघेही गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्यांना तात्काळ जालना येथे हलविण्यात आले परंतु जालना येथे नेत असताना पती विष्णू गारुडी यांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली तर जालना येथे उपचारा दरम्यान मंगलाबाई ही मरण पावल्या.
सदरील दुर्दैवी घटनेने वाल सावंगी गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, अपघातानंतर सदरील एसटी भोकरदन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून चालक ही पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

Total Page Visits: 19 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!