शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याचे आवाहन.
हिंगोली प्रतिनिधी- रमेश जावळे
हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी पर्यंत असून महाडीबीटी पोर्टलवर ३ डिसेंबर पासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आँनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्या नंतर संबंधीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हे अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावयाचे आहे तसेच विहित वेळेत शिष्यवृत्ती धारकाने आपले बँक खाते आधारशी जोडणी करुन घ्यावे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.