माहुर तालुक्यात लोकनायक प्रकाश पोहरे यांच्या हस्ते किसान ब्रिगेड शाखा फलकाचे अनावरण……
माहूर तालुका प्रतिनीधी : गजानन भारती

माहूर तालुक्यातील कुपटी येथे किसान ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक लोकनायक प्रकाश भाऊ पोहरे यांचे हस्ते दिनांक 20 रोजी शेतकऱ्यांच्या व सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी समर्पित असणा-या किसान ब्रिगेड च्या शाखेचे रिबन कापून अनावरण करण्यात आली.
देशात शेतकरी समस्यांचा वणवा पेटलेला असताना व शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या करत असताना तो आवाज एकसंघ रहावा म्हणून निर्भीड लेखणीचे धनी असणारे लोकनायक प्रकाश भाऊ पोहरे यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी समर्पित असनारे किसान ब्रिगेड नावाचे व्यासपिठ माहुर तालुक्यांच्या गावोगावी व वाडी तांड्यावर शेतकऱ्यांची शक्ति वाढवन्या साठी शाखा उभारून केले.
प्रत्येक वेळी जगाचा पोशिंदा असणारा हा भोळा भाबडा शेतकरी राब राब राबूनही आपल्या हक्काचा मोबदला घेऊ शकत नाही. त्याची या व्यापारी विश्वात वेळोवेळी पिळवणूकच होत राहते आणि म्हणून उरी संकल्प करुन सबंध महाराष्ट्रभर दौ-यावर निघालेल्या लोकनायक प्रकाश भाऊ पोहरे यांनी शेतकऱ्यांना हक्काच्या संघर्षाचं किसान ब्रिगेड च्या माध्यमातून भिक नको हक्क हवा म्हनण्या साठी एक दालन उपलब्ध करून दिल्याच्या भावना त्यांनी या प्रसंगी मार्गदर्शनात व्यक्त केल्या.
यावेळी प्रदेशाध्यक्ष अविनाश काकडे, राष्ट्रीय प्रवक्ता पुरुषोत्तम गावंडे,प्रदेश समन्वयक प्रकाश बुटले, संभाजी टेटर, धीरज धुमाळ सह माहूर तालुका ब्रिगेडचे अध्यक्ष विलास गावंडे पत्रकार जयकुमार अडकिने व जिल्हा संघटक अविनाश टनमने, संभाजी ब्रिगेडचे तालुका प्रवक्ता पंढरीनाथ ठाकरे, मा. जि. प.सदस्य प्रकाश पाटील भुसारे,प. सदस्या अनिता कदम, विश्वनाथ कदम, आत्माराम पाटील, श्रीराम भुसारे, उत्तम कदम, पत्रकार गजानन भारती, गोपाळ कदम सह देवानंद कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी शाखा अध्यक्ष शुभम कुर्मे, उपाध्यक्ष बंडु सरकुंडे, सचिव दिपक देशमुख, सदस्य किरण राठोड, शामराव कवडे,अक्षय राऊत,आनंद चोभे,रवी भुसारे, गजानन हाके, शिवदास टेकाळे, नारायण आगीरकर, विकास भुसारे, साहेबराव सिदनवाड व गजानन हांबीरगे सह देवानंद गायकी यांनी विश्वनाथ कदम व पत्रकार गजानन भारती सर यांचे मार्गदर्शना खाली विशेष परिश्रम घेतले.
तालुक्यातील रुई, हाडसनी, दिगडी,कुपटी, वानोळा, वाई, गोंडवडसा, मदनापुर, गोकुळ सह अनेक ठिकाणी फलक अनावरण केले. सोहळ्याप्रसंगी गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.