Breaking NewsHealth & EducationHome and abroadMaharashtraState

एकविसाव्या शतकातील धाराई : ४२ वर्षांच्या निधी परमार

कोल्हापूर- सुभाष भोसले

सौ निधी परमार हीरनंदानी वय ४२ वर्षे. प्रसिद्ध फिल्ममेकर व प्रोड्युसर या वर्षी आई झाल्या. बाळासाठी पहिले सहा महिने सर्वांत मूल्यवान, सकस, पौष्टीक व निर्जंतूक दूध आईचेच मानले जाते. निधी यांचे बाळ सर्व दूध पित नव्हते. दूध वेस्ट( वाया) जातंय हे त्यांच्या लक्षात यायला लागले. या वाया जात असलेल्या दुधाचे काय करायचे हा प्रश्न त्यांनी वाईस न्यूज चॅनलवर इंटरव्हूत मांडले. १५० मिली चे तीन पॅकेट त्यांनी फ्रिजरला काढूनही ठेवले होते. इंटरनेटवर फ्रिजरला ब्रेस्ट मिल्क तीन चार महिने सुरक्षित राहते याची माहिती असल्याने त्यांनी साठविले होते.
आपले वाया जाणारे ब्रेस्ट मिल्क उपयोगी पडावे म्हणून माहिती घेताना लक्षात आले की अमेरिकेत ब्रेस्ट मिल्क डोनेशन केले जाते. निधी यांनी मुंबईत त्यांनी आसपासच्या लोकांकडून शोध घेतला असता. मुंबईतील गायनोकोलॉजिस्ट हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट मिल्क बँकेचा पत्ता सापडला.
मार्च, २०२० मध्ये करोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू झाला. मुंबईतील सूर्या हॉस्पिटलच्या नियोनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटला डोनेट करायला सुरवात केली. या युनिटला भेट दिली असता युनिटमध्ये ६५ एक्टिव्ह बेड असून प्रिमॅच्युर मुले व वजन खूपच कमी असणारी मुले आढळून आली. किमान वर्षभर अंगावर दूध असेपर्यंत निधी या हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट मिल्क डोनेट करणार आहेत.
————————————-
मे, २०२० ते नोव्हेंबर, २० अखेर निधी यांनी आपले ४२ लीटर दूध डोनेट केले आहे. वजन कमी असणाऱ्या प्रिमॅच्युअर आजारी बाळांना व आई आजारी असणाऱ्या बाळांना वरदान ठरून त्यांची जीव वाचला. आपण वर्षभर अंगावर दूध असेपर्यंत हे करणार आहात.
————————————-
निधी परमार हीरनंदानी यांनी आपल्या दुधाच्या केलेल्या दानाची तुलनाच होऊ शकत नाही. रक्तदान व ब्रेस्ट मिल्क दान हे जगातील सर्वोत्तम दान आहे. ब्रेस्ट मिल्क दान फक्त आईच करू शकते. छत्रपती शिवपुत्र संभाजीराजे यांनाही धाराऊनेच आपले दूध पाजले होते.
सौ निधी परमार हीरनंदानी आपण लॉकडाऊनच्या काळात केलेल्या ब्रेस्ट मिल्क दानामुळे आपण शेकडो बाळांची आई झालात. एवढं परम भाग्य या देशात तुमच्या सारख्या एखाद्याच आईच्या वाट्याला येतं. विशेष म्हणजे आपण स्वत: महिती घेऊन, संपर्क साधून व पदरमोड करून व रक्त आटवून हे सर्व या देशातील मुले सुदृढ,निरोगी व सतेज व्हावीत यासाठीच केल्याचे सांगितले. सौ निधीआई आपणास आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे चरणी प्रार्थना.
सौ निधी परमार हीरनंदानी या “सांड की आँख ” चित्रपटाच्या निर्माता होत्या.
संपत गायकवाड (माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

Total Page Visits: 145 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!