गुरु शनि युती पहा दुर्बिणीतून
कोल्हापूर- सुभाष भोसले

दिनांक 21 डिसेंबर रोजी गुरु व शनि ह्या दोन बलाढय ग्रहांची युती होत आहे, ह्या दिवशी सायंकाळी 6,04 वा, सूर्यास्तानंतर अंधार पडल्यावर पश्चिम क्षितिजावर ही युती सायंकाळी 6,30 ते 8,15 या वेळेत साध्या डोळ्यांनी पाहायला मिळेल , 8,15 वा, या युतीचा अस्त पश्चिम क्षितिजावर होईल, कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस चंबुखडी टेकडीवर सर्व नागरिकांसाठी गुरु शनि ची युती तसेच मंगळ ग्रह व चंद्र दुर्बिणीतून पाहण्याची दुर्मिळ संधी खगोल अभ्यासक किरण गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे, योगायोगाने याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन समाप्त होऊन उत्तरायण सुरू होणार आहे, त्यामुळे या दिवशीचा मूळ पश्चिम दिशेपासून जास्तीत जास्त दक्षिणेकडे होत असलेला सूर्यास्त सुद्धा सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी पाहायला मिळणार आहे, या दिवशी वर्षातील सर्वात मोठी 12 तास 54 मिनिटांची रात्र व सर्वात छोटा 11 तास 05 मिनिटांचा दिवस असणार आहे, दक्षिणायन ,उत्तरायण ,ग्रह , तारे राशी , नक्षत्र यांचे मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे असा सायंकाळी 05:45 ते 08:45 या काळात तीन तासांचा कार्यक्रम होणार आहे, आम जनतेमध्ये खगोल शास्त्राची आवड निर्माण व्हावी व गुरू शनी ची दुर्मिळ युती सर्व नागरिकांना दुर्बिणीतून पाहता यावी यासाठी सदरचा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आलेला आहे, यापूर्वी अशी संधी सन 1623 ला आली होती, आयुष्यात एकदाच येणारी ही दुर्मिळ संधी दवडल्यास पुन्हा सन 2080 ची वाट पहावी लागेल, तरी कोरोना साथीचे सर्व शासकीय नियम पाळून या दुर्मिळ संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन खगोल अभ्यासक किरण गवळी, वैभव राऊत व यश आंबोळे कोल्हापूर यांनी केले आहे, संपर्क 9922666111