Breaking NewsEditorialMaharashtra

ऋतुजा व रोहीणी मुळक यांचे आॅनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश

अंबड प्रतिनिधी – भागवत गावंडे

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त्य
ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन (AIITA) व जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ११ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त आयोजित ‘ भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद ऑनलाईन प्रश्न मंजुषा 2020 ‘ आयोजित करण्यात आली होती. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत जि.प.प्रा.शा.बारसवाडा केंद्र डोणगाव येथील कु. रोहीणी राम मुळक हिने इयत्ता सातवी या गटातून तृतीय क्रमांक पटकावला. तसेच कु. ऋतुजा राम मुळक या ओमशांती विद्यालय शहापूर येथील विद्यार्थीनीने इयत्ता नववी या गटातून प्रथम क्रमांक पटकावला. या विजेत्या स्पर्धकांना जि.प.जालनाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ साहेब यांच्या हस्ते प्रमाणपञ व ट्राफी देऊन गौरव करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीधर कुलकर्णी सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी ऑल इंडिया आयडीयल टिचर्सचे जिल्हा सचिव शरीफ खान सर, प्रा.शा.बारसवाडा येथील श्री अर्जुन खोंडे सर, राम मुळक तसेच स्पर्धेतील विजयी स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते. ऋतुजा व रोहीणीचे गटशिक्षणाधिकारी श्री विपुल भागवत साहेब, डोणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री रमेश फटाले सर , शा.व्य.स.अध्यक्ष अशोकराव घाडगे, ग्रामस्थ शिक्षणप्रेमी , शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाषराव चाटे, श्री नंदबन्सी सर, श्री वाजे सर, श्री खोंडे सर, श्री गोल्हार सर ,सचिन सुळे ,केंद्रातंर्गत मुख्याध्यापक, शिक्षकवृंद ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Total Page Visits: 31 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!