Breaking NewsHealth & EducationMaharashtraState

दैठणा पोलिसांनी पकडला 547 पोते तांदूळ…

परभणी, दि. 17 (प्रतिनिधी)

  • दैठणा पोलिसांनी गुरुवारी (दि.17) सकाळी नऊच्या सुमारास 547 पोते घेऊन जाणारा ट्रक ताब्यात घेतला. दरम्यान, तांदळाची माहिती महसूल विभागास देण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. एका ट्रकमधून राशनच्या तांदळाची मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असल्याची माहिती दैठणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी गंगाखेड – परभणी रस्त्यावर फौजदार श्री.आदोडे, कर्मचारी काशिनाथ मुलगीर, कांबळे, कुरेशी, श्री पवार यांच्यासह श्री. पाडाळकर हे रोडवर थांबले असता एक ट्रक भरधाव वेगाने जाताना त्यांना दिसला. भरधाव जाणार्‍या त्या ट्रकला (क्र.एमएच26 एडी 1765) दैठणा पोलिसांनी थांबवले. ट्रकचालकाची चौकशी केली असता त्याने शेख अन्सार शेख अफसर (रा.पालम) असे नाव सांगीतले. ट्रकमध्ये 27 टन तांदूळ असल्याचे त्याने म्हटले. मात्र, तांदळाच्या बिलाची पावती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगीतले. तसेच मालाबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. गुजरातला आपण हा माल नेत असल्याचे सांगीतले. यावेळी मालाची पाहणी केली असता त्यात 547 पोते तांदूळ आढळला असून तो राशनचा असावी, अशी शक्यता असल्याने तो ट्रक पोलिसांनी दैठणा पोलिस ठाण्यात आणून लावला. याबाबत पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर यांनी महसूल विभागास याची माहिती दिली. दरम्यान, महसूलच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्री. पाडाळकर यांनी महाराष्ट्र प्रेसशी बोलताना दिली.
Total Page Visits: 64 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!