कोरोना काळात सामाजिक सेवा देणा-या माधुरी खोत
कोल्हापूर- सुभाष भोसले

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. संपुर्ण देश घरी असताना लोकांना प्रत्येक घडामोडीची माहिती , आरोग्यविषयक सल्ला कोराना काळात सामाजिक सेवा देणा-या माधुरी खोत ह्या स्वतः फिल्ड वरच कार्यरत होत्या .व त्या स्वतः डाॕ.शिक्षण घेत आहेत यावेळी त्यांनी आपल्या अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्थेमार्फत स्थलांतरीत मजूर, गरिब कुटुंबांना मास्क,औषधे,धान्याचे मोफत वाटप करून मदत केली. अशाच प्रकारची मदत देणा-या सामाजिक बांधिलकी जोपासणा-या माधुरी खोत यांचाही कोरोना योद्धा म्हणून समावेश होता.
महामारीच्या काळातही स्वत:ची पर्वा न करता राञ आणि दिवस लोकांच्या आरोग्यासाठी खोत ह्या फिल्डवर उतरून त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा विविध संस्था,संघटना मार्फत सन्मान करण्यात आला. कोरोनाच्य़ा संकट काळात आपापल्या परिने गरजूंना मदत करण्यासाठी ह्या रणरागिणींनी आपल्या जीवाची परवा न करता डाॕ दिपा कुष्ठे.डाॕ नंदीनी गावडे.अश्वीनी खोराटे.डाॕ माधुरी खोत या महिला डाॕक्टरांना सोबत घेवुन पुर्ण जिल्हयामध्ये समाजकार्य केले. आपल्याकडे जे आहे त्यामधून इतरांना मदत करण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. याच संस्कृतीचे पालन करत सामाजिक कार्यकर्त्या माधुरी खोत या रणरागिणींनी आपापल्या क्षेत्रातील कामाच्या व्यापातून वेळ काढत गरजूंना लॉकडाऊनच्या काळात मदत केली. त्यांच्या याच कार्याची दखल घेत कोरोना रणरागिणी म्हणून त्यांचा कित्येक ठिकाणी गौरव करण्यात आले.
सर्व खाजगी व शासकीय यंञनेचा तान कमी झाला आहे परंतु गेल्या काहि महिन्याचा कोरोणाचा भुतकाळ विसरुन चालनार नाहि दिवाळीच्या घाईत कोरोणाला जनता फारसे गांभीर्य दिले नाहि यामुळे आपण स्वत :च कोवीडची दुसरी लाट आणण्यास जबाबदार ठरत आहोत व याचा फटका सर्व सामान्य जनतेला बसणार आहे अनेक देशामध्ये पुन्हा कोरोणाने थैमान घातले आहे. हिच कोरोणाची लाट आपल्या देशामध्ये येवु नये आणि चुकुन जरी ती आली तरी ती सौम्य की तीव्र हे येणारा भविष्य काळ ठरवेल तरीहीआपण प्रदुषण कमी करण्याचे व स्वतःची काळजी घेण्याचे व इतराना काळजी घ्यायला सागण्याचे मोलाचे कार्य करु शकतो. कारण गेली दोन दिवसात वातावरणात सुर्य दिसेनासा झालाय पर्यावरणात पावसाळा उन्हाळा का हिवाळा हेच कळेना झालय कोरोणा हा आजार श्वसन संस्थेशी निगडीत आहे आणि या अशा वातावरणात एकंदरीत विचार करता श्वसन संस्थे चे आजार वाटत आहेत शिवाय झालेल्या दिवाळीतील फटाकेमुळे सल्फर हा वायु हवेत मोठ्या प्रमाणात मिक्स झाला आहे यामुळे दम्याचे आजार व श्वसनाचे आजार बळावतील व कोरोणाला निमंञण दिले जाईल. माणसामध्ये सुरक्षीत अंतर ठेवा माणुसकी मध्ये नको . मास्कचा वापर करा . वारंवार हात धुवा प्रतिकारशक्ती वाढेल अशा सात्त्विक आहाराचा वापर करा स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या माणसातील माणुसकी जपा आपल्या समुध्द पर्यावरणाचे प्रदुषण वाचवा तरच कोरोणापासुन आपण व आपले कुंटुब सुरक्षित राहिल. शेवटी एकच वाचवाल तर वाचाल….
शब्दांकण ः- माधुरी खोत ः अध्यक्षा अनंतशांती बहुउद्देशिय सस्था