Breaking NewsHealth & EducationMaharashtraState

सोशल सर्कल मल्टी परपज सोसायटी मार्फत मुकबधीर मुलांना स्वेटर व अन्नदान कार्यक्रम संपन्न

सुभाष भोसले : कोल्हापूर

कसबा वाळवे येथील गुरूकूल विनाअनुदानित दिव्यांग शाळेत सोशल सर्कल च्या माध्यमातून विद्यार्थ्याना कपडे व भोजनाचे वाटप करणेत आले समाजातील कोणताही घटक उपेक्षित न राहता सामाजिक न्याय देण्याचा दृष्टीने सोशल सर्कल सोसायटीच्या वतीने हा उपक्रम राबविणेत आला. दिव्यांग मुलांना स्वेटर व रुचकर जेवणाचा स्वाद देण्यात आला,तसेच आमशी तालुका करवीर गावचे सुपुत्र योगेश पाटील यांचेकडून भोजन बनविण्यासाठी लागणारे विविध वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या या कार्यक्रमास कसबा वाळवेचे माजी सरपंच सुनील चव्हाण,सोशल सर्कल च्या अध्यक्षा सौ सुमित्रा फराकटे, सौ रोहिणी भोसले,सुभाष भोसले प्रशांत भोसले,संतोष चव्हाण, अमित उरणे , अशोक पाटील, रोहीणी पाटील, पूनम यादव व प्राजक्ता चव्हाण तसेच योगेश पाटील,शिवराज पाटील,अनिल पाटील,कृष्णात पाटील, रंजना पाटील,संजय भोईटे,जगदीश कणकेकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय नीळपणकर यांनी केले तर स्वागत प्रास्ताविक सुशांत पाटील व आभार जितेंद्र कोठावळे यांनी मानले.

Total Page Visits: 9 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!