Breaking NewsHealth & EducationMaharashtraState

शिक्षण संस्थाचालकांद्वारे उद्या राज्यव्यापी शाळा बंद…………….

परभणी, दि. 17 (प्रतिनिधी)

चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांसंदर्भात घेतलेले निर्णय रद्द करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने शुक्रवारी (दि.18) राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे. माध्यमिक शाळा संहितेत शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या पदांची संख्या निश्‍चित करण्याबाबतचे निकष आणि नियुक्तीची कार्यप्रणाली कार्यान्वित आहे. आजतागायत या संहितेत आणि कायद्यात कोणताही बदल केल्या गेले नाहीत, परंतु या कायद्यात राज्य सरकारने बदल करण्याचे कोणतेही निकष न पाळता नव्याने काही निर्णय घेतले आहेत. तेच निर्णय असंवैधानिक आहेत, असे मत राज्य शिक्षण संस्था महामंडळाने व्यक्त केले. सद्यस्थितीत अनेक शाळांमधून अत्यावश्यक असलेली पदेही चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची आहेत. असे असतांनाही ही पदे राज्य सरकारने रद्द केल्याने शाळांसमोर अनेक प्रश्‍न उभे राहीले आहेत. विशेषतः स्वच्छता आणि सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, असेही मत व्यक्त केले. राज्य सरकारने हा वादग्रस्त निर्णय मागे घ्यावा, यासाठी शुक्रवारी राज्यव्यापी शैक्षणिक संस्थांचा बंदचे आवाहन महामंडळाने केले असून यानंतरही सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास बेमुदत शाळाबंद आंदोलन केले जाईल. गरज भासल्यास जेलभरो आंदोलनही केले जाईल, असा इशारा महामंडळाचे राज्य सचिव माजी आ. अ‍ॅड. विजय गव्हाणे यांनी दिला आहे. राज्यातील विना अनुदानीत घोषित-अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना त्वरीत अनुदान द्यावे, 2019-20 चे वेतनोत्तर अनुदान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरीत वितरीत करावे, मोडकळीस आलेल्या व धोकादायक शाळांच्या बांधकामासाठी विशेष अर्थसहाय्य करावे यासह अन्यही मागण्या प्रलंबित आहेत, असेही गव्हाणे यांनी म्हटले. दरम्यान, महामंडळाने पुकारलेल्या या आंदोलनात परभणी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष डॉ. विवेक नावंदर, कार्याध्यक्ष उदय देशमुख, सचिव बळवंत खळीकर, उपाध्यक्ष संतोष धारासूरकर, सूर्यकांत हाके, कोषाध्यक्ष अनिल तोष्णीवाल, जिल्हा समन्वयक रामकिशन रौंदळे, विजय जामकर, अनिल नखाते, गणेशराव रोकडे, रामराव उबाळे, मुंजाजी भाले पाटील, राजेंद्र लहाणे, आनंद अजमेरा, निसार पटेल, रहीम पठाण, नवनाथ मुजमुले, दिपक तापडीया, शंकरराव वाघमारे, हरिभाऊ शेळके, प्रा.विनायकराव कोठेकर, प्रा.तुकाराम साठे, लक्ष्मीकांत देशमुख, प्रदीप कोकडवार यांनी केले आहे.

Total Page Visits: 78 - Today Page Visits: 2

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!