Breaking NewsHealth & EducationMaharashtraState

शालेय शिक्षण विभागाच्या सरल पोर्टलवर चुकीच्या उल्लेख करून ब्राह्मण समाजाला स्वतंत्रपणे दाखवून ईतर ओपन समाजापासून वेगळे दाखवण्याचा प्रयत्न का – विश्वजीत देशपांडे

कमलेश शेवाळे : अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर : शालेय शिक्षण विभागाने सरल पोर्टलवर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास सुरुवात केली आहे या पोर्टल वर विद्यार्थ्यांचे नाव पत्ता वय जात इत्यादी माहिती टाकण्यात येते ज्यामध्ये जात या रकान्यात पूर्वी सर्व जातींचा उल्लेख असायचा परंतु गेल्या काही दिवसात या रकान्यात बदल झाला असून फक्त “ब्राह्मण किंवा इतर” असे दोनच पर्याय आता दिसत आहेत. ही बाब गंभीर आहे असे का केले असावे हे अनाकलनीय आहे यामुळे ब्राह्मण व ब्राह्मणेतर वेगळे आहेत असा चुकीचा संदेश जातो व आधीच जातीयद्वेषाचा बळी ठरलेल्या ब्राह्मण समाजाला आता शासन देखील सापत्न वागणूक देणार की काय असा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला आहे. हे पोर्टल विद्यार्थ्यांची माहिती घेत आहे आपण विद्यार्थ्यांची अशी विभागणी करून आपण नक्की काय साध्य करणार आहोत ? भविष्यात या विभागणी मुळे ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट वागणूक देण्याचा शासनाचा मानस आहे काय ? असे गंभीर प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत . हिंदू धर्मात जनरल विभागात ब्राह्मण समाजाला ईतर समाजापासून वेगळे दाखवून शिक्षण विभाग असा काय बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहे ही जाणूनबुजून केलेल्या चुकीमुळे सर्व समाजात वेगळा संदेश देण्याचा खटाटोप हे सरकार करत असल्याचा आरोप विश्वजीत देशपांडे यांनी केला असून अश्या द्वेषपुर्ण चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेऊन लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा पत्राद्वारे राज्याच्या शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड, राज्यमंत्री शिक्षण मा.ना.बच्चू कडू, शिक्षण आयुक्त श्री विशाल सोळंके यांना दिला आहे.

Total Page Visits: 11 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!