Breaking NewsMaharashtra

आरटीओने केली साठहून अधिक वाहनांवर कारवाई…. वाहनांची तपासणी.- वाहतुक शाखेचे सहकार्य

परभणी – प्रतिनिधी 

उपप्रादेशीक परिवहन विभाग व शहर वाहतुक शाखेने गुरुवारी (दि. 17) गंगाखेड रोडवर केलेल्या वाहनांच्या तपासणीची संयुक्त मोहीम राबवत 60 हून अधिक वाहनांवर कारवाई करीत विना कागदपत्र वाहन चालवणार्‍यांना दंड अकारला.
दरम्यान, वाहनधारकांनी कागदपत्रे जवळ बाळगावित, वाहतुक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी म्हटले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड रस्त्यावर गुरुवारी सकाळपासून विना कागदपत्रे वाहन चालवण्याससह प्रवाशी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघण करणार्‍यांविरूध्द मोहीम राबविण्यात आले. वाहन निरीक्षक अभिजीत वाघमारे, अभिजीत तरकसे, अभिजीत गायकवाड, जयश देवरे, यांच्यासह उपप्रादेशीक परिहवन कार्यालयातील कर्मचारी, पोलिसांच्या वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस नितीन काशीकर, जावेद शेख, राम मुंडे, अजय भराडे, वाकळे, राऊत, निलेश कांबळे, महिला कर्मचारी इंगळे, वावळे आदींनी या मोहीमेत सहभाग नोंदवला.
यावेळी वाहन परवाना नसलेले, हेल्मेट न घातलेले, वाहनांची नोंदणी नसलेल्या वाहनांसह इंश्युरंस न भरलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. एका टिप्परसह अ‍ॅटो, दुचाकी वाहनांवर पथकाने कारवाई केली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 60 हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.
दरम्यान, अवैध प्रवाशी वाहतुक करणार्‍या वाहनधारकांनी वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची ने-आण करू नये, वाहतुकीचे नियम पाळावेत, वाहनांची कागदपत्रे सोबत बाळगावित अन्यथा संबधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते, वाहन निरीक्षक अभिजीत वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन काशीकर यांनी दिला आहे.

Total Page Visits: 59 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!