नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर होणार कठोर कारवाई… पोलिस अधीक्षक जयंत मीना यांचे आदेश…
परभणी, दि. 17 (प्रतिनिधी)
जिल्हा पोलीस दलाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी उपपरिवहन अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिले.
दरम्यान, मंगळवारी (दि. 15) एका दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 114 वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सुत्रानी दिली.
गंगाखेड – परळी रस्त्यावर 13 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. यात हायवा ट्रक व ऑटोमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी शहर वाहतूक शाखेचेसह जिल्ह्यातील सर्व पपोलिस ठाण्यांना अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते मंगळवारी एका दिवसात 114 वाहनांवर कारवाई करण्यात आली. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार असून वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, जास्त प्रवासी वाहनात बसवू नये , असे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी म्हटले आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक मीना यांनी परिवहन अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेत त्यांना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा वाहनांचे परवाने निलंबित करण्याची कारवाईसुद्धा करावी, असेही बैठकीत श्री मीना यांनी म्हटले.