हिंद भारतीय जनरल कामगार सेनेची मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट पदाधिकाऱ्यासोबत बैठक संपन्न
कोल्हापूर- सुभाष भोसले

हिंद भारतीय जनरल कामगार सेना महाराष्ट्र या संघटनेचे सरचिटणीस श्री घनश्याम नाईक यांनी मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट च्या कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी व राधानगरी तालुका पदाधिकाऱ्यांच्या समवेत वेगवेगळ्या विषयावर कामगारांच्या प्रश्नावर तपशीलवार चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय सहसचिव श्री मोहम्मदयासीन शेख, प्रदेश सचिव अमित वेंगुरलेकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री संजय शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री विजय पाटील उपाध्यक्ष श्री महेश नंदे , जिल्हा सचिव श्री सचिन मुदांळे , ज्येष्ठ पत्रकार व जिल्हा पदाधिकारी श्री राजेंद्र जी सूर्यवंशी,जिल्हा मंत्री शमशुद्दीनजी जमादार यांचेसह राधानगरी तालुका अध्यक्ष श्री याकूबजी बक्षु, तालुका पदाधिकारी श्री निवास हुजरे, श्री हिंदुराव खोत श्री संजय हळदकर श्री राजाराम पाटील श्री वैभव पाटील तसेच हातकणगले तालुका अध्यक्ष श्री अरुण रावळ, आनंद शांती एनजीओचे श्री भगवान गुरव यांनी ग्रामीण कामगारांच्या ज्वलंत समस्या मांडल्या व त्या सोडवण्याची विनंती केली. या चर्चेअंती हिंद भारतीय जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांचे वतीने सरचिटणीस श्री घनश्याम नाईक व चिटणीस श्री यादव यांनी संघटनेच्यावतीने आमचे पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले. यावेळी नागरिका स्पिनिंग मिल चे कामगार कोल्हापुरातील इतर कामगार वर्ग हजर होता.