एकास चौघानी जबरदस्तीने नेले पळवून… गव्हा येथील घटना : ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी, दि. 17 (प्रतिनिधी)
ऊस तोडणीसाठी आताच चल असे म्हणत चौघांनी एकास जबरदस्तीने पळून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 15) तालुक्यातील गव्हा तेथे घडली. त्यावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. याबाबत अधिक माहिती अशी, की गव्हा येथील अक्षय उत्तमराव खरात यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारित, गजानन चांदु काळे (रा. साळापुरी तांडा), राजू पवार, उत्तम गोरखनाथ काळे (रा. गव्हा), अन्य एका व्यक्तीने मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास माझे वडील उत्तम नागोराव खरात यांना ऊस तोडणीसाठी आत्ताच चल असे म्हटले. यावेळी त्यांनी जबरदस्ती करत वडिलांना पळून नेले अशी तक्रार दिली. त्यावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुलिस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास फौजदार भगवान जाधव हे करित आहेत.