प्रा. प्रसाद ठाकूर यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. प्रदान

कोल्हापूर: सुभाष भोसले
मुंबई विद्यापीठातील् वृत्त पत्र विद्या आणिआणि जनसंवाद विभागात कार्यरत असलेले प्रा. प्रसाद ठाकूर विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. प्रा. ठाकूर यांनी ‘नॉव्हेल अँड फिचर फिल्म: ट्रान्सफॉर्मेशन स्टडीज’ विषयावर शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि जनसंवाद विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला होता. तसेच त्यांना मुंबई विद्यापीठातील त्यांचे जेष्ठ सहकारी डॉ. सुंदर राजदीप, डॉ. संजय रानडे, प्रा.दैवता पाटील आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांना मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, उप-कुलसचिव डॉ. एन . शिंदे, डॉ. रवींद्र ठाकूर, डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. भारत जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. शिवाजी जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोककुमार जत्राटकर, डॉ. मनोज ठाकूर आणि प्रा. सागर कारंडे यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले. अध्यापन आणि संशोधन या सोबतच डॉ. ठाकूर यांनी ‘माध्यमांतर’ आणि ‘पथेर पांचाली’ (अनुवाद) या ग्रंथांचे लेखन केले आहे. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत कास्टिंग डायरेक्टर आणि सहायक दिग्दर्शक उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. मास कम्युनिकेशन या विषयात शिवाजी विद्यापीठात सादर झालेला पहिलाच प्रबंध आहे. एका वेगळ्या विषयावर आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे संशोधन केल्याबाद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.