स्पर्श हळव्या मनाचा व्हाट्स अप समूहाचा स्नेहमीलन कार्यक्रम संपन्न.

टेम्भुर्णी प्रतिनिधी
आजच्या धकाधकीच्या जीवनात, आणि डिजिटल दुनियेत जगत असताना, प्रत्येकाकडे आता स्मार्ट फोन आला आहे. आणि ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहे त्यामध्ये व्हाट्स अप नसेल तर तो मोबाईल आणि माणूस काय कामाचा…..
व्हाट्सअप च्या ग्रुप मध्ये सध्या एका व्हाट्स अप ग्रुप ची चर्चा आता महाराष्ट्रात होऊ लागली आहे.
स्पर्श हळव्या मनाचा व्हाट्स अप चा समूह नांदेड जिल्ह्यातुन स्थापन झाला आणि एका वर्षात मध्ये महाराष्ट्र भर पसरला. त्याचे कारणही तसेच आहे. सदरील ग्रुप हा एका विचाराने बनलेला असून ग्रुपमध्ये डॉक्टर, वकील, अधिकारी, अभियंता, शिक्षक, पोलीस प्राध्यापक, नगरपालिका कर्मचारी, विद्यार्थी, लेखक, कवींचा भरणा आहे.
हा ग्रुप मध्ये नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, बीड, कोल्हापूर, सातारा, अमरावती, ठाणे, कल्याण, पुणे, जालना येथील सदस्य यांचा सहभाग आहे.
सदरील ग्रुप चे स्नेह मिलन कार्यक्रम दि.13 डिसेंबर 2020 रोजी नांदेड येथे पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय अजितपाल सिंघ संधू यांच्या हस्ते पार पडले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश कंठाळे हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक एस. एन. थोरवे, वैद्यकीय अधिकारी व बाल रोग तज्ञ डॉक्टर प्रकाश गुरुतवाड, सौ. अलका नागरे, सौ. मनीषा बोडखे यांची उपस्थिती होती.
या ग्रुप च्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त पुरविणे, अडचणीत असणाऱ्या सदस्यांना मदत करणे, कोविड योध्याचा सन्मान करणे. अश्या विविध प्रकारचे कार्यक्रम ग्रुप मार्फत आयोजित केले गेले आहे. अशी माहिती ग्रुप चे मुख्य प्रशासक डॉ. लखन कत्तेवार यांनी दिली आहे. स्नेह मिलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र. समूह प्रशासक आनंद सावरकर, मुख्य संयोजक सरोज पाटील, समूह सल्लागार सौ. राधिका करकरे, जगदिश उराडे, प्रवीण दिकंटवार यांनी परिश्रम घेतले.
बाळु सावंत, अरुण टेकने,प्रा.गुरुनाथ पाटील, आकाश सुर्य, नितिन राठोड, अंजली ईंगळे,सरोज पाटील,संगिता गरबडे,गजानन सोनकांबळे,सतीश आढाव,प्रविन दीनकटवार,रागीनी मॅडम, स्मीता मॅडम, हे उपस्थित होते.