Breaking NewsMaharashtraState

अन्यायकारक शासन निर्णय त्वरीत रद्द करावा – शिक्षक भारती संघटनेकडून उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना निवेदन

कोल्हापूर- सुभाष भोसले

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा दि.११ डिसेंबर २०२० चा शासन निर्णय हा पूर्णतः अन्यायकारक आहे. शासनानेच नेमलेल्या आकृतिबंध समितीने सुचवलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विरोधातील शासनाच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जाहीर निषेध करत आहेत. शासनाच्या या पळपुटे धोरणाचा शिक्षक भारती संघटनेकडून जाहीर निषेध करणेत आला

२००५ पासून वेळोवेळी शासनाने अध्यादेश काढून आकृतिबंधाच्या नावाखाली चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद ठेवलेली आहे. आजपर्यंत अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, शासनाबरोबर चर्चा, इत्यादी लोकशाही मार्गाने शिक्षकेत्तर महामंडळाने व संघटनेने या प्रश्नांबाबत सातत्याने विरोध करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज महाराष्ट्रातील बहुतांशी शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. आज ना उद्या याबाबत सकारात्मक शासन निर्णय घेईल व आपली नियमित वेतनश्रेणी वर नियुक्ती होईल या आशावादावर गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून शाळेमध्ये चतुर्थ श्रेणी सेवक पदावर काम करत असलेल्यांच्या पदरी आजच्या शासन निर्णयाने केवळ आणि केवळ निराशाच आलेली आहे. शासकीय कार्यालयातील शिपायांची कामे व माध्यमिक शाळांमधील शिपायांची कामे यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे हे शिक्षकेतर संघटनेने वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. शाळांमध्ये अतिशय विश्वासाने आमचे चतुर्थश्रेणी कर्मचारी शालेय, प्रशासकीय अशी जबाबदारीची कामे अतिशय खात्रीने, विश्वासाने पार पडत असतात.

शिपाई भत्ता देऊन कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा शासनाचा हा डाव शिक्षकेतर संघटना यशस्वी होऊ देणार नाहीत. अशा कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आपली मुले सुरक्षित राहतील की नाही याचादेखील समाजाने विचार करणे आवश्यक आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत असताना अशाप्रकारे शासन निर्णय घेणे हे निश्चित योग्य नाही. सदरचा शासन निर्णय त्वरीत रद्द करावा या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक कोल्हापूर श्री सत्यवान सोनवणे व कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना शिक्षक भारती संघटना पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड , कोल्हापूर जिल्हाध्यक्ष काकासाहेब भोकरे, जिल्हा सचिव अनिल चव्हाण सर्व पदाधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकडून देणेत आले .

Total Page Visits: 53 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!