Breaking NewsMaharashtra

जाफ्राबाद तालुक्यातील वरुड रोडवर अपघाताचे सत्र -रस्त्याचे झाले तीनतेरा..

जाफ्राबाद प्रतिनिधी

जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद ते वरुड या रस्त्यावर आता पर्यंत बांधकाम विभागा मार्फत रस्ता बनवण्यात आला होता परंतु बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे.रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून डांबरही निघाले आहे, मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक व प्रवाशांना पूर्वीच्या अनुभवांना सामोरे जावे लागत आहे रस्त्यावरील डांबर व खडी पुर्णतः उखडून गेली असून वाहनधारकांचे मोठे हाल होत आहे,.रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे
वारंवार रस्ता सुधारण्यासाठी बांधकाम विभागाकडे मांगणी करूनही रस्त्याचे काम अद्याप अपुरेच आहे रस्ता जागोजागी उखरडलेला आहे वारंवार अपघातही होत आहे तरीही हे विभाग हा रस्ता सुधारवण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करत आहेत..

बांधकाम विभागाने लाखो रुपयांचा निधी या रस्त्यासाठी खर्च केला आहे.परंतु हा रस्ता थोडेही दिवस तग धरू शकला नाही.त्यामुळे शासनाच्या पैशाचा उपयोग व्यर्थ गेला अशी म्हणण्याची वेळ आली संबंधित ठेकेदाराकडून या रस्त्याची पूर्ण दुरुस्ती करून घ्यावी.अशी मागणी करण्यात येत आहे.
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होऊनही अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. सध्या साखर कारखाने सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर उसाची वाहतूक या रस्त्याने केली जात आहे. साईडपट्ट्याही व्यवस्थित नसल्यामुळे अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. संबंधित ठेकेदाराची रस्ता पूर्णत्वानंतर दुरुस्ती करण्याची तरतूद असूनही ठेकेदार टाळाटाळ करत आहेत तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत अनेक दिवसापासून खड्डे असल्याने ते तात्काळ बुजवण्यात यावे, साईडपट्ट्यांवर मुरूम भरण्यात यावा व रस्त्याच्या बाजूला धोकादायक असणारी झाडे तोडण्यात यावी अशी मागणी वरुड गावचे ग्रामस्त व वाहनधारक करत आहे.

Total Page Visits: 47 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!