दोन कंपन्यांची लस तिसऱ्या टप्प्यात; ना. टोपे

जालना प्रतिनिधी
सध्या दोन कंपन्यांची लस तिसऱ्या टप्प्यात आहे. कोरोना लसीसाठी केंद्राकडे डोळे असून केंद्र सरकारची परवानगी मिळाल्या नंतर मतदानाच्या बुथ प्रमाणे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते आज जालना येथील कलश सिड्स येथे राष्ट्रवादी च्या व्हरच्युअल मेळाव्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
राज्य सरकारने लसी सबंधी सम्पूर्ण तयारी पूर्ण केली असून पहिल्या टप्प्यात 3 कोटी डोस उपलब्ध होऊन त्याचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाचा संबंध चीन आणि पाकिस्तानशी जोडल्याच्या प्रश्नावर टोपे यांनी निषेध व्यक्त करत, कोणाचा हात पाय डोळे असला तरी देशातील शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा असून त्या प्रश्नाला प्राधान्य दिले गेले पाहिजे असे मत व्यक्त करत, शेतकरी कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध पाहता हा कायदा रद्द करण्याची मागणी देखील टोपे यांनी यावेळी केली.