नंदागौळच्या शेतकऱ्यांच्या फुलगोबीची कृषी पथकाकडून पाहणी

बीड प्रतिनिधी
परळी तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील एका शेतकऱ्यांनी नर्सरी कडुन फुलगोबीचे रोप खरेदी केली, माञ 106 दिवस उलटुनही फुलगोबी आलीच नसल्यामुळे गेल्या आठवड्यात कृषी विभागाकडे नर्सरी विरुध्द तक्रार केली होती.
शेतकऱ्यांच्या या तक्रारीची दखल घेऊन आज बुधवारी कृषी विभाग व कृषी विद्यापीड आणी पं.स.चे अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
नंदागौळ येथील शेतकरी बालाजी संपत गिते यांनी माजलगाव तालुक्यातील आलापुर गावातील निसर्ग हायटेक नर्सरीतुन दिं. 26/8/2020 रोजी धवल फुलगोबी इस्ट वेस्टची 10000 रोपे किंमत 7000 रूपये व माधव फुलगोबी युनायटेडची 7000 रोपे किंमत 4900 रूपये अशी 17000 हजार फुलगोबीची रोपे 11900 रूपयांना खरेदी करून आपल्या एका एकराच्यावर शेतात लावली होती.
रोपे लावल्यापासुन 65 ते 70 दिवसात उत्पादन मिळेल, असे निसर्ग हायटेक नर्सरीतर्फे सांगण्यात आले होते. परंतु 106 दिवस उलटुन गेले तरी फुलगोबीचे उत्पादन निघाले नसुन माझी फसवणुक होऊन आर्थिक नुकसान झाले.
यासाठी निसर्ग हायटेक नर्सरीकडुन मला नुकसान भरपाई मिळावी व विनाउत्पान देणारी रोपे विक्री प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी नंदागौळचे शेतकरी बालाजी संपती गिते यांनी परळीच्या गटविकास अधिकारी यांच्या कडे लेखी निवेदन दिले होते