स्वयंसेवकांनी बुजवला जीवघेणा खड्डा

अर्जुनी मोर. संतोष रोकडे :- बोंडगाव देवी ते अर्जुनी मोर. ह्या वर्दळीच्या रस्त्यावर शाम राईस मिल च्या समोर डांबरी रोडवर मध्यभागी मोठा खड्डा पडलेला होता.बोंडगाव देवी चे माजी सरपंच राधेश्याम झोळे व भाजपाचे तालुका महासचिव रत्नाकर बोरकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी गावातील दोन स्वयंसेवकांना सांगुन तो जीवघेणा खड्डा बुजवीला.
साकोली – ते अर्जुनी मोर. हा राज्यमहामार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली या राज्यमहामार्गावर दुरुस्ती व डागडुजीच्या नावावर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र नेहमीच या रस्त्यावर मधोमध मोठमोठे भगदाड पडतात.अशातच बोंडगाव देवी ते अर्जुनी मोर रस्त्यावर शाम राईस मिलच्या समोर मध्यभागी मोठा खड्डा पडलेला होता. याठिकाणी दुचाकीवर प्रवास करणा-या अनेक लोकांचे अपघात झाले आहेत. जिवीतहानी झाली नसली तरी दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या जीवघेण्या खड्याबद्दल बोंडगाव देवी चे माजी सरपंच राधेश्याम झोळे व भाजपाचे तालुका महासचिव रत्नाकर बोरकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी गावातील दोन स्वयंसेवक प्यारेलाल बोरकर, व बलदेव बोरकर यांना सांगुन सात डिसेंबर रोजी तो जीवघेणा खड्डा बुजवला. अजुनही सदर रोडवर खड्डे पडले असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने ते खड्डे बुजवावे असी मागणी रत्नाकर बोरकर, राधेश्याम झोळे यांनी केली आहे.